छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टिझरने चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. या टीझरला खूप पसंती मिळाली असून डिसेंबरमध्ये या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. टीझर ॲक्शन पॅक्ड असून अप्रतिम आहे. टीझरमध्ये मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांच्या शौर्याचे किस्से जिवंत पाहायला मिळतात. विकी कौशल या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. (Aurangzeb In Upcoming Film Chhaava)
टीझर पाहता तो या भूमिकेसाठी पूर्णपणे योग्य असल्याचे दिसत आहे. टीझर प्रदर्शित झाल्यानंतर विकीचा लूक आणि युद्धातील दृश्ये चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे नाव घेताच स्वराज्याचा शत्रू औरंगजेबाचाही उल्लेख येतो. ‘छावा’च्या टीझरमध्येही औरंगजेबाची झलक पाहायला मिळते, जो म्हणतो, “शिव गेला, पण विचार जिवंत ठेवला”. टीझरमध्ये औरंगजेबची भेदक नजर आणि कर्कश आवाज पाहायला मिळतोय, हे पाहिल्यानंतर लोकांना जाणून घ्यायचे होते की औरंगजेबची भूमिका कोण साकारत आहे?
आणखी वाचा – Video : ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीने खरेदी केली महागडी कार, कुटुंबियांबरोबर पूजा आणि जल्लोष, व्हिडीओ व्हायरल
आणि औरंगजेबाच्या या भूमिकेत तो अभिनेता दुसरा कोणी नसून अक्षय खन्ना आहे. ‘छावा’मध्ये अक्षय खन्ना औरंगजेबची व्यक्तिरेखा साकारत आहे, जो पूर्णपणे ओळखता येणं कठीण झालं आहे. तसेच तिच्या लुकचे खूप कौतुक होत आहे. टीझरमध्ये अक्षय खन्नाचे औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेतील रूपांतर पाहण्यासारखे आहे. टीझरवर बारकाईने नजर टाकली तर म्हातारा औरंगजेबाचा चेहरा अक्षय खन्ना असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सुरुवातीला चाहते त्याला ओळखू शकले नाहीत आणि तो अक्षय खन्ना आहे. यावर विश्वास ठेवायलाही तयार नव्हते.
आणखी वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी रुग्णालयात भरती, बेडवरील फोटोही केला शेअर, म्हणाली, “नक्की काय झालं हे…”
मात्र काही काळानंतर अक्षय खन्ना औरंगजेबाची भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट झाले. आता ‘छावा’मधील विकी कौशलच्या लूकबरोबरच अक्षय खन्नाच्या अप्रतिम ट्रान्सफॉर्मेशनचीही चर्चा होत आहे. अक्षय खन्नाची औरंगजेबच्या व्यक्तिरेखेत दिसण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. टीझरमधील त्याच्या एका डायलॉगने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचवेळी, आता ‘छावा’मध्ये विकी कौशल व अक्षय खन्ना यांची जोडी एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.