‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेला भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका अव्वल स्थानावर असलेली पाहायला मिळत आहे. मालिकेत सायली व अर्जुनच्या जोडीवर तर प्रेक्षक खूप प्रेम करत आहेत. सायली ही भूमिका मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी साकारताना दिसत आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली या पत्रामुळे जुईला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. याशिवाय याआधीही जुईने अनेक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. (Jui Gadkari Health Update)
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. सध्या ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत ती सायली हे पात्र साकारत असून तिची ही भूमिका अनेकांच्या पसंतीस उतरत आहे, आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचं प्रचंड मोठा चाहतावर्गही आहे.सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला सहा वर्ष पूर्ण, कलाकारांची दमदार पार्टी, म्हणाले, “खूप काही शिकण्यासाठी धडपड…”
मालिकाविश्वात सक्रिय असलेल्या या अभिनेत्रीने सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये जुईने तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. जुई सध्या आजारी असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याचं तिने शेअर केलेल्या पोस्टवरुन समोर आला आहे. या पोस्टमध्ये जुईने तिच्या हाताला आयव्ही लावलेला हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला आहे.

जुई सध्या हॉस्पिटलमध्ये असून उपचार घेत आहे. “आयव्ही बंद. डिस्चार्ज आज मिळणार. नेमकं काय झालं होत याबाबतचे अपडेट मी तुम्हाला लवकरच देईन”, असं कॅप्शन देत तिने आयव्ही लावलेल्या हाताचा फोटो शेअर केला आहे. यावरुन आता जुईची तब्येत स्थिर असल्याचं समजत आहे. प्रकृती स्थिर असल्याने आज जुईला घरी सोडण्यातही येणार आहे. लवकर जुईच्या तब्येतीबाबतची अपडेट समोर येईल.