शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : भाकरी, वांग्याचं भरीत अन्…; जंगलामध्ये ऐश्वर्या नारकर घेत आहेत घरच्या जेवणाचा आस्वाद, स्वतः बनवलं संपूर्ण जेवण आणि…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 9, 2024 | 4:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Lunch Video

Video : भाकरी, वांग्याचं भरीत अन्…; जंगलामध्ये ऐश्वर्या नारकर घेत आहेत घरच्या जेवणाचा आस्वाद, स्वतः बनवलं संपूर्ण जेवण आणि…

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी नेहमीच त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांच्या सौंदर्याचेही लाखो दिवाने चाहते आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या सौंदर्याने कायमच साऱ्या प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. अभिनयासह त्या सोशल मीडियावरही बर्यापैकी सक्रिय असतात. नेहमीच त्या सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. ऐश्वर्या नारकर पती अविनाश नारकर यांच्यासह नेहमीच हटके डान्स व्हिडीओ, रील शेअर करत असतात. (Aishwarya Narkar Lunch Video)

ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. सोशल मीडियावर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. नारकर जोडीला त्यांच्या व्हिडीओवरुन अनेकदा ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. त्यांनी शेअर केलेल्या एखाद्या व्हिडीओला काही चाहते प्रतिसाद देतात, तर काही ट्रोलही करतात. ऐश्वर्या व अविनाश त्यांच्या शूटिंगच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून नेहमीच रील शेअर करताना दिसतात. ऐश्वर्या नारकर फिटनेसबाबतचे अनेक व्हिडीओही पोस्ट करत असतात.

आणखी वाचा – लग्नानंतर हनिमूनला पोहोचले शिवानी सुर्वे व अजिंक्य ननावरे, शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, म्हणाला, “माझ्या बायकोची…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

सध्या ऐश्वर्या नारकर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसत आहेत. अशातच अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवरुन त्यांच्या लंच ब्रेकमधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्याने जेवणातील खास पदार्थ दाखवले आहेत. बरं हा व्हिडीओ ऐश्वर्या यांनी थेट शूटिंग लोकेशनवरुन शूट केला आहे. यावेळी ते जंगलात बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांनी स्वतःच्या हातून घरुन बनवून आणलेलं जेवण दिसत आहे.

आणखी वाचा – १९ वर्षांचा संसार मोडला, एक मुलगी अन्…; घटस्फोटानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने निवडला अध्यात्मचा मार्ग, आश्रमातील व्हिडीओ केला शेअर

ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओत नाचणीची भाकरी, वांग्याचे भरीत, मटकीची उसळ, कोशिंबीर असं सात्विक जेवण पाहायला मिळत आहे. “तंदुरुस्त राहा निरोगी राहा” असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. शुटींग लोकेशनला थेट शेतात बसून जेवणाचा आस्वाद घेतानाच हा व्हिडीओ त्यांनी शूट केला आहे. ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत पंसती दर्शविली आहे.

Tags: Aishwaraya Narkaraishwarya narkar instagramaishwarya narkar lunch videoentertainmentmarathi actressmarathi malika
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Actress debina bonnerjee and gurmeet choudhary trolled for turning little-daughter upside down

"बाळाच्या मानेला…", देबिना-गुरमीतने मुलाला उलटं लटकवताच नेटकऱ्यानी सुनावलं, व्हिडीओ पाहून म्हणाले, "खेळणं नाही तुम्ही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.