‘मुंबईचा फौजदार’, ‘देवता’, ‘जिवा सखा’, ‘पानिपत’ अशा अनेक दर्जेदार मराठी व हिंदी सिनेमांमधून रवींद्र महाजनी यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. रुबाबदार व्यक्तिमत्वाच्या जोरावर रवींद्र महाजनी यांनी १९७५ ते १९९० हा काळ चांगलाच गाजवला. रवींद्र महाजनी यांच्या अचानक आलेल्या निधनाची बातमी ऐकून फक्त चाहत्यांमध्येच नाही तर मराठी सिनेविश्वात देखील मोठी खळबळ माजली आहे. (Ravindra Mahajani Daughter)
देखणे अभिनेते म्हणून रवींद्र महाजनी यांची सिनेसृष्टीत ओळख होती. रवींद्र महाजनी यांच्या चौकोनी कुटुंबात त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी आहेत. रवींद्र महाजनी यांच्या पाठोपाठ लेकाने सिनेसृष्टीत पाऊल टाकल्याने गश्मीर महाजनीला सर्वच लोक ओळखतात. पण त्यांची मुलगी रश्मी ही झगमगत्या दुनियेपासून लांबच राहिली.
पाहा कोण आहे रवींद्र महाजनी यांची लेक (Ravindra Mahajani Daughter)
रवींद्र महाजनी यांची लेक गश्मीरची बहीण ही विवाहित असून ती गश्मीर पेक्षा तब्बल १३ वर्षांनी मोठी आहे. तीन वर्षांपूर्वी गश्मीरने बहिणीसाठी राखबंधनाचं औचित्य साधत एक पोस्ट शेअर केली होती, ती पोस्ट सध्या चर्चेत आहे. “माझी बहीण, माझ्याहून १३ वर्षांनी मोठी. माझी छोटी आईच ती! K.G. पासून ते पाचवी पर्यंत – माझा डब्बा भरणे, मला शाळेसाठी तयार करणे, मला तिच्या कायनेटिक होंडा वरुन शाळेत सोडणे – तिनेच केले. हिरो होण्याकरता मला सिनेसृष्टीत येण्याची गरज नव्हती.
जन्मापासूनच मी तिचा स्टार होतो. माझ्या चित्रपटांना यश मिळो वा न मिळो, माझी एक फॅन निश्चितच माझ्या पाठीशी कायम उभी असेल कारण तिचं प्रेम आणि तिची निष्ठा परिस्थितीनुसार बदलत नाही. म्हणूनच नैराश्य माझ्या आसपासही भटकत नाही. स्वामी म्हणतात “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” .. अर्थात, ते कुणाच्या रुपाने माझ्या पाठीशी उभे आहेत हे तुम्हाला समजलेच असेल,” असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.
हे देखील वाचा – ‘तुम्ही लोक फार निर्दयी आहात’…वडिलांच्या निधनानंतर गश्मीरच्या पोस्ट वर संतापले चाहते
रवींद्र महाजनी यांच्या मृत्यबद्दल ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे गश्मीर महाजनी याला ट्रोल करण्यात येत आहे. पंरतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, गश्मीरच्या विरोधात बोलणारे जसे आहेत, तसेच त्याची ही काही तरी बाजू असेल, काहीही माहित नसताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल इतकी मोठी विधान करणं चूक आहे असं मानणारे देखील गश्मिरचे चाहते आहेत. तर रवींद्र महाजनी यांच्या निधनानंतर गश्मीरला ट्रोल करणं कितपत योग्य आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.