बुधवार, एप्रिल 29, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : लखनवी कुर्तीचे हटके Collection, कुठेही न मिळणारे पॅटर्न फक्त ५५० रुपयांपासून ‘या’ दुकानात मिळणार

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 21, 2024 | 8:30 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya narkar lacknowi kurti

Video : लखनवी कुर्तीचे हटके Collection, कुठेही न मिळणारे पॅटर्न फक्त ५५० रुपयांपासून 'या' दुकानात मिळणार

ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने आणि त्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ऐश्वर्या यांच्या सौंदर्याचे लाखो दिवाने चाहते आहेत. फिटनेसच्या बाबतीतही ऐश्वर्या नेहमीच काळजी घेताना दिसतात. ऐश्वर्या यांचा फॅशन सेन्सही खूप चांगला आहे. सोशल मीडियावर त्या नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच त्या काही ना काही करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सोशल मीडियावरुन त्या अनेक फोटो, व्हिडीओ चाहत्यांसह शेअरही करताना दिसतात. अशातच ऐश्वर्या यांचा Summer Fashion लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. (Aishwarya narkar lacknowi kurti)

ऐश्वर्या नारकर यांनी अलिकडेच एक फोटोशूट केलं. हे खास फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्या नारकर यांनी जांभळ्या रंगाच्या लखनवी कुर्ती परिधान केली. या कुर्तावर सिंपल नक्षीकाम करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. या उन्हाळ्यात तुम्ही देखील असा लूक ट्राय करु शकता. ऑफिससाठी हा परफेक्ट लूक ठरू शकतो. तुम्हाला असे कुर्ते सहज कुठे मिळू शकतात याचा एक खास व्हिडीओ मज्जा पिंक या युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – गंभीर दुखापत, आईला वाटलं मृत्यू झाला अन्…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली, “डोक्याला सूज असतानाही…”

प्रत्येकीच्या कपाटात एक तरी लखनवी कुर्ता असतोच. पण लखनवी म्हटलं की एक ठरलेला पॅटर्न किंवा डिझाईन पहायला मिळतो. म्हणूनच मज्जा पिंकने असं एक ठिकाण शोधून काढलं आहे ज्यात लखनवी कुर्ती एकापेक्षा एक डिझाइनर कलेक्शनमध्ये पाहायला मिळणार आहेत. लखनवी कुर्त्यांचे रंग, डिझाइन, पॅटर्न अगदी योग्य दरात आणि हव्या त्या साइझमध्ये उपलब्ध आहेत. अगदी २८ ते ४८ साइझ पर्यंत येथे लखनवी कुर्ती उपलब्ध आहेत. नायरा कटमध्येही आता लखनवी कुर्ती उपलब्ध आहेत. याची किंमत ७५० रुपयांपासून सुरु आहे. आलिया कटमध्येही या कुर्ती उपलब्ध असून याची किंमत ९५० रुपयांपासून सुरु होते. याची क्वालिटी उत्तम असून हे उन्हाळ्यासाठी खूप खास कलेक्शन ठरू शकते.

आणखी वाचा – “तुझं अफेअर सुरु आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं सत्य, म्हणाली, “माझं अफेअर…”

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

साध्या कॉटन लखनवी कुर्ती येथे ६५० रुपयांपासून सुरु आहेत. अगदी 7xl पर्यंत येथे कुर्ती उपलब्ध आहेत. तर थोड्या चांगल्या कॉटनच्या लखनवी कुर्ती येथे १२५० रुपयांपासून उपलब्ध आहेत. तसेच लखनवी कुर्ती आणि पायजमा असा सेटही येथे विविध रंग आणि पॅटर्नमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत १५५० रुपयांपासून सुरु होते. या कुर्ती रुहीस कलेक्शन, गणेश पेठ लेन, स्टार मॉलच्या बाजूला, दादर पश्चिम,मुंबई येथे मिळतील. येथून कुर्ती ऑर्डर करण्यासाठी तुम्ही या दुकानाच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करुन ऑर्डर करु शकता. तसेच तुम्ही दुकानाच्या ८३७८९९९१९९ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. लखनवी कुर्तींवर तुम्ही अंबाडा कॅरी करून त्यावर गजरा लावून हा लूक पूर्ण करू शकता. तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी हेअरस्टाईल खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ऐश्वर्या यांनी लखनवी कुर्तींवर हा खास लूक केला होता.

Tags: aishwarya narkarAishwarya narkar lacknowi kurtilucknowi kurtiwhere you can buy locknowi kurti
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 anil gawas on aastad kale
Entertainment

“फोन वाजतो तिकडे तुमचं लक्ष का?”, आस्ताद काळेच्या त्या व्हिडीओवर अभिनेते स्पष्टच बोलले, म्हणाले, “प्रेक्षक तुम्हाला…”

एप्रिल 29, 2026 | 5:16 pm
Bharat kapoor death
Entertainment

‘चंद्रकांता’ फेम अभिनेत्याचे वयाच्या ८०व्या वर्षी निधन, राकेश बेदी अंत्यसंस्काराला उपस्थित

एप्रिल 28, 2026 | 9:42 am
Gayatri Datar Wedding
Entertainment

Gayatri Datar Wedding : कुर्यात सदा मंगलम्! अखेर गायत्री दातारचा शाही विवाहसोहळा संपन्न, पहिला फोटो आला समोर

एप्रिल 27, 2026 | 2:34 pm
Rohan Gujar Twins Baby
Entertainment

‘होणार सून मी…’ फेम अभिनेता झाला बाबा, लग्नाच्या आठ वर्षांनी केलं जुळ्या मुलांचं स्वागत, बाळांची नावं…

एप्रिल 27, 2026 | 12:12 pm
Next Post
bhau kadam home

Video : मोठं अंगण, घरासमोर शेती अन्…; कोकणात इतकं साधं पण तितकंच सुंदर आहे भाऊ कदम यांचं घर, Inside Video समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.