Govinda And Sunita Ahuja : सध्या बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या जोराने वाहू लागल्या आहेत. लग्नाच्या तब्बल ३७ वर्षानंतर, दोघांच्या विभक्ततेच्या बातमीने एक खळबळ उडाली आहे. गोविंदाचा पुतण्या कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मिरा शाह यांनी या अहवालांचे वर्णन खोटे असल्याचं म्हटलं आहे. अभिनेत्याच्या व्यवस्थापकाने खुलासा केला की, सुनीताने कोर्टाला कायदेशीर नोटीस पाठविली आहे, परंतु अभिनेत्याने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. अर्थात, गोविंदा आणि सुनीता यांनी अद्याप विभक्त होण्याच्या बातमीवर काहीही प्रतिक्रिया दिली नाही, परंतु अभिनेत्याच्या पत्नीने म्हणजेच सुनीता यांनी त्यांचे वडील लग्नाच्या विरोधात असल्याचे उघड केले होते.
सुनिता आहुजा यांनी सांगितले होते की, त्याच्या वडिलांनी गोविंदाशी लग्न करावे अशी त्यांची इच्छा नव्हती. हेच कारण होते की जेव्हा सुनीताने गोविंदाशी लग्न केले तेव्हा ते त्यांच्या लग्नात हजरही नव्हते. याविषयी सुनीताने ‘हॉटफ्लाय’ ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. वास्तविक सुनीता आणि गोविंदाच्या जीवनशैलीत बरेच फरक होते. पण तरीही सुनीताने गोविंदाशी लग्न केले. त्याच्या वडिलांना हे आवडले नाही आणि त्यांनी लग्नात सहभाग घेतला नाही.
सुनीताने सांगितले होते, “मी माझे पती गोविंदावर खूप प्रेम केल्यामुळे मी सर्व काही सहन केले. माझी आई पाली हिलमध्ये राहायची आणि ती मॉडर्न होती, ती खूप श्रीमंत कुटुंबातून होती. माझे वडील आर्थिकदृष्ट्या मजबूत नव्हते. त्यांचा विरारहून स्ट्रगल हा सुरु होता. ही एक अतिशय बॉलिवूड टाईप कहाणी होती ज्यात नंतर त्यांनी आमच्या लग्नात भाग घेतला नाही”. सुनीताचे वडील गोविंदाबरोबरच्या तिच्या लग्नाच्या विरोधात होते कारण लेकीला हलाखीच्या परिस्थितीत वावरताना पाहणं त्यांना पाहवणार नव्हतं. पण वडिलांच्या इच्छेविरुद्धही सुनीताने गोविंदाशी लग्न केले. पण लग्नानंतर सुनिताला बऱ्याच काही गोष्टी सांभाळून घ्याव्या लागल्या.
आणखी वाचा – ‘बालवीर’ फेम देव जोशीचं थाटामाटात लग्न, नेपाळमध्ये पार पडला विवाहसोहळा, सुंदर फोटो समोर
सुनीताने सांगितले होते की, लग्नाच्या वेळी हे स्पष्ट केले होते की जोपर्यंत त्यांची आई आहे तोपर्यंत ती घराची प्रमुख असेल. सुनिताच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत तिची सासू जिवंत आहे तोपर्यंत गोविंदाने सुनिता तेच करेल जे आई सांगेल. आईचा शब्द हा शेवटचा शब्द आहे. आणि आई नसताना सुनीता तिच्या मर्जीने तिला हवे ते करु शकते. सुनिताने गोविंदावरील प्रेमापोटी त्याच्या सर्व अटी स्वीकारल्या. सुनीताने सांगितले होते की बर्याच वर्षांपासून सासूबाईंबरोबर राहिल्यानंतर, घरातील रीती भातींची तिला सवय लागली होती.