Baalveer Fame Dev Joshi Married : सध्या सर्वत्र लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. नुकतीच ‘मिसमॅच’ फेम अभिनेत्री प्राजक्ता कोळीचा शाही विवाहसमारंभ संपन्न झाला. तिच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यानंतर आता ‘बालवीर’ फेम देव जोशीने लग्नगाठ बांधली असल्याचं समोर आलं आहे. ‘बालवीर’ अभिनेत्याने त्याची दीर्घ काळातील जोडीदार आरतीशी लग्न केले. २५ फेब्रुवारी रोजी त्याने नेपाळमध्ये लग्न केले आणि हा समारंभ अगदी थाटामाटात उरकला. त्याने हा आनंदाचा क्षण त्याच्या चाहत्यांसह शेअर केला आहे. देव जोशी नेपाळचा जावई बनला आहे. देवने त्याच्या लग्नातील खास क्षणांचे बरेच फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात या अतिशय सुंदर लग्नाच्या झलक साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
देव जोशीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अगदी पारंपरिक अंदाजात आणि थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडला आहे. याचे अनेक फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत त्यावर खास कॅप्शनही दिले आहे. देव जोशीच्या लग्नाच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली आहे आणि चाहत्यांनी या जोडप्याचे बरेच अभिनंदन केले आहे. यापूर्वी, देवने हळद आणि मेहंदी समारंभाच्या अनेक झलक देखील शेअर केल्या आहेत.
आणखी वाचा – ‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजचा पहिला भाग आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता शिगेला
या फोटोंमध्ये लोकांना दोघांची जोडी आवडली असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. आरती ही नेपाळची आहे आणि आता दोघांनाही दोन्ही देशांतील चाहत्यांकडून प्रेम मिळत आहे. देवला ‘बालवीर’ मुळे खूप प्रसिद्धी मिळाली होती आणि तो शोच्या बर्याच भागांत तो दिसला. या व्यतिरिक्त तो ‘महिमा शनी देव की’ या मालिकेमध्येही दिसला आहे. असे सांगितले जात आहे की, केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे लोक या लग्नात उपस्थित होते. चाहत्यांनी त्याच्या आनंदी विवाहित जीवनासाठी प्रार्थना केली आहे.