शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

समीर चौघुले व सई ताम्हणकरची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र, ‘गुलकंद’मध्ये धमाल भूमिकेत दिसणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 26, 2025 | 3:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saie Tamhankar And Samir Chaughule

समीर चौघुले व सई ताम्हणकरची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र, 'गुलकंद'मध्ये धमाल भूमिकेत दिसणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

Saie Tamhankar And Samir Chaughule : मराठी चित्रपटांच्या यादीत आता एका नव्या कोऱ्या चित्रपटाची एंट्री झाली आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या टीझरची सर्वत्र चर्चा रंगली. हा चित्रपट म्हणजे ‘गुलकंद’. गुलकंद चित्रपटाच्या टीझरमध्ये सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचे प्रेमळ नाते पाहायला मिळाले, ज्यामुळे चित्रपटाबाबतच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे. पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजाबरोबरच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित ‘गुलकंद’ या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीने मांडला आहे. ‘एव्हरेस्ट एंटरटेनमेंट’ व ‘वेटक्लाउड प्रॉडक्शन्स’ निर्मित ‘गुलकंद’ या फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळेल.
या चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – प्रेमामुळे सगळं काही सहन केलं अन्…; गोविंदासह लग्नाला सुनिता यांच्या वडिलांचा होता विरोध, आर्थिक परिस्थितीही नव्हती तेव्हा…

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

समीर चौघुले म्हणतात, “सई आणि माझी ओळख ‘फू बाई फू’ पासूनची आहे, त्यावेळी ती अँकर होती आणि मी स्पर्धक. त्यानंतर आम्ही वरचेवर भेटायचो, परंतु कधीच एकत्र काम केलं नव्हतं. हास्यजत्रेत हास्यरसिक म्हणून ती आमचे स्किट्स बघते, त्यावर प्रतिक्रिया देते. जवळ जवळ ९०० एपिसोड्स तिने पाहिले आहेत. आता ‘गुलकंद’च्या निमित्ताने तिच्याबरोबर काम करण्याचा योग आला आणि मी यासाठी खूप उत्सुक होतो. कामाच्याबाबतीत ती खूप मेहनती, अभ्यासू आहे. तिच्याबरोबर काम करताना तिनेच मला खूप कम्फर्टेबल केले. सईकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. ती एक चांगली सह-कलाकार आणि चांगली मैत्रीण आहे”.

आणखी वाचा – ‘बालवीर’ फेम देव जोशीचं थाटामाटात लग्न, नेपाळमध्ये पार पडला विवाहसोहळा, सुंदर फोटो समोर

सई ताम्हणकर कामाबाबतीतील अनुभवाबाबत बोलताना म्हणाली, “हास्यजत्रेत समीरला समोर परफॉर्म करताना पाहणं आणि त्याच्यावर टिप्पणी करणं नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे, कारण त्याला कोणत्याही मान्यतेची गरज नाही. तो एक अप्रतिम अभिनेता आहेच आणि माणूस म्हणूनही तो तितकाच उत्कृष्ट आहे. त्याच्या कॅरॅक्टरसारखाच तो खूप भोळा आणि विनम्र असल्यामुळे आमचं खूप जमतं. सहकलाकार म्हणूनही त्याच्याबरोबर काम करायला खूप मजा आली. तो खरा जेंटलमॅन आहे आणि मला त्याच्याबरोबर पुन्हा काम करायला नक्कीच आवडेल”.

Tags: gulkand moviemarathi movieSaie Tamhankar And Samir Chaughule
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Alia Bhatt Viral Video

Video : …अन् त्या महिलेने थेट आलिया भट्टचा हातच पकडला, रणबीर कपूर धावत आला आणि…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.