Govinda Sunita Ahuja Divorce : गोविंदा आणि सुनिता आहुजा यांच्या घटस्फोटाची बातमी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. २ फेब्रुवारी रोजी सकाळी, जेव्हा सर्वत्र त्यांच्या घटस्फोटाची बातमी पसरली तेव्हा साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. या अनुमानांवर या जोडप्याने शांतता ठेवली असून गोविंदाच्या कुटुंबातील सदस्यांनी आता या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कृष्णा अभिषेक, आरती सिंग आणि आता कॉमेडियनची पत्नी काश्मिरी शाह यांनी चालू असलेल्या या चर्चांवर भाष्य करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. तब्बल ३७ वर्षानंतर हे जोडपे घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आहे. अशातच आता सत्य काय आहे, ते ज्ञात झाले आहे. गोविंदा आणि सुनीता यांच्या या घटस्फोटांच्या चर्चांवर आता त्यांच्या भाच्यांनी भाष्य केलं आहे,.
‘न्यूज १८’शी संभाषणात काश्मिरी शहा यांनी गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तावर आपले मत दिले आहे. “या फक्त अफवा आहेत” असा दावा त्यांनी केला. ३७ वर्षांच्या गोविंदा व सुनीता यांच्या नात्यावर काश्मिरा म्हणाली, “मला त्याच्या आयुष्याबद्दल काहीही माहित नाही. पण मला वाटते की ही एक भयानक अफवा आहे”. काश्मिरा शाहच्या अगोदर, आरती सिंग यांनीही तिच्या मामाच्या घटस्फोटाच्या वृत्तावर भाष्य केले होते आणि त्यास निराधार अफवा म्हटले. आरती यांनी सांगितले की, “तो भारतात नाही आणि आपल्या कुटुंबाशी संपर्कात नाही परंतु आम्हाला विश्वास आहे की ही फक्त खोटी बातमी आहे”.
आणखी वाचा – ‘मिसमॅच’ फेम प्राजक्ता कोळी अखेर लग्नबंधनात, शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो समोर
आरतीने असेही म्हटले आहे की काही काळापूर्वी त्याच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या आहेत. आरती आणि काश्मिराच्या अगोदर कृष्णा अभिषेक या बातमीवर बोलणारी कुटुंबातील पहिली व्यक्ती होती. त्यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’ला सांगितले, “हे शक्य नाही. ते घटस्फोट घेणार नाहीत”. २ फेब्रुवारी रोजी सकाळी गोविंदा आणि सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या वृत्तानुसार बातम्या बनल्या.
आणखी वाचा – ‘मैत्रीचा ७/१२’ वेबसीरिजचा पहिला भाग उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता शिगेला
बॉलिवूड सुपरस्टार आणि त्याची पत्नी सुनीताने १९८७ मध्ये लग्न केले होते. आता, लग्नाच्या सुमारे ३७ वर्षानंतर, असे अनुमान लावले जात आहेत की हे जोडपे अधिकृतपणे वेगळे होतील. आरती सिंगबद्दल बोलायचे झाले तर ती गोविंदाची भाची आणि टीव्ही उद्योगातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. गेल्या काही वर्षांत आरतीने ‘बिग बॉस १३’, ‘उतरण’, ‘परिचय’ सारखे बरेच कार्यक्रम केले आहेत.