अभिनेत्री अश्विनी महांगडे तिच्या अभिनय क्षेत्रातल्या कामा व्यतिरिक्त तिला असणाऱ्या सामाजिक भानासाठी तसेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे उपक्रम ती राबवत असते त्यासाठी देखील तितकीच प्रसिद्ध आहे. सध्या अश्विनी स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या मालिकेत पहायला मिळतेय.तिची अनघा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेत जस तीच पात्र आहे, त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यात ही अश्विनी पहायला मिळते. सक्षम,परखड असं तीच व्यक्तिमत्व आहे. (Ashvini Mahangade And Deepa Chaudhari)
त्याच सोबत सध्या अश्विनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.शाहीर साबळे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत देखील तिने ऐतिहासिक भूमिका पार पाडली आहे.अशा वेग वेगळ्या प्रकारच्या भूमिका अश्विनी साकारत असते. तिच्या अभिनयाच्या सहजतेमुळे अश्विनीच्या भूमिका प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात.
पहा जेव्हा अश्विनी आणि अश्विनी भेटतात (Ashvini Mahangade And Deepa Chaudhari)
याच चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरी याची पत्नी दीपा चौधरी हिच्या सोबतचा एक फोटो अश्विनीने रील अँड रिअल अश्विनी असे कॅप्शन देत तिच्या इंस्टग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. दीपा चौधरी ही सध्या झी मराठीवरील तु चाल पुढं या मालिकेत मुख्य नायिका आहे आणि तिच्या या पात्राचं नाव देखील अश्विनीच आहे. त्यांच्या या फोटोवर प्रेक्षकांनी खूप लाईक्स आणि कमेंट्स देखील केले आहेत. सख्ख्या बहिणीनं सारख्या दिसताय अशी देखील एक कमेंट त्या फोटोवर आली आहे. कलाकारांचं हे पडद्यामागचं बॉण्डिंग कायमच प्रेक्षकांना आकर्षित करत.(Ashvini Mahangade And Deepa Chaudhari)

तु चाल पुढं मधील दीपा ची अश्विनी ही भूमिका अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारी आहे. स्वतःच्या आत्मविश्वासाच्या जोरावर अश्विनीने इथपर्यंतचा प्रवास केला आहे. अनेक स्त्रिया या दीपाच्या या पात्राकडून खूप गोष्टी शिकत आहेत आणि त्यांचा त्यांना त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील फायदा होतोय. त्यांचे अनुभव दीपाने तिच्या अनेक मुलाखती मध्ये सांगितले आहेत.
हे देखील वाचा : शिवकन्या देतेय गडकिल्ले संवर्धनाची हाक