काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पाल यांच्या अचानक गायब होण्याची बातमी आली आणि त्यांच्या चाहत्यांसह सर्वांनाच धक्का बसला. घडलेल्या प्रकरणाबाबत त्यांच्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. अशातच सुनील पालनंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या अपहरणाचे वृत्त समोर येत आहे आणि हा अभिनेता म्हणजे मुश्ताक खान. अभिनेता मुश्ताक खाननेही अपहरण झाल्याचा दावा केला आहे. एका कार्यक्रमाच्या बहाण्याने बोलावून त्याचे अपहरण केल्याचे अभिनेत्याने म्हटलं आहे. (mushtaq khan kidnapped)
मुश्ताक खानचा मित्र व व्यावसायिक पार्टनर शिवम यादवने याबाबत खुलासा केला आहे. अपहरण करणाऱ्या टोळीने मुश्ताकची सुटका करण्यासाठी दोन लाख रुपयांची खंडणीही मागितली होती. इंडिया टुडे डिजिटलशी बोलताना शिवम यादव म्हणाले की, मुश्ताकला २० नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये एका अवॉर्ड शोसाठी बोलावण्यात आले होते. त्यासाठी त्याला आगाऊ रक्कमही देण्यात आली होती. यानंतर त्यांना विमानाचे तिकीटही पाठवण्यात आले. दिल्लीत उतरल्यावर त्याला कारमध्ये बसवून दिल्लीच्या बाहेरील बिजनौरजवळ कुठेतरी नेण्यात आले”.
पुढे तो असंही म्हणाला की, “मुश्ताक सर आणि त्यांचे कुटुंब त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराने हादरले. मात्र, स्वत:ला शांत करुन एफआयआर दाखल करणार याची त्याला नेहमीच खात्री होती. मी बिजनौरला जाऊन अधिकृत एफआयआर दाखल केला. आमच्याकडे विमानाची तिकीटे, बँक खाती आणि विमानतळाजवळील सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा आहे आणि तो संबंधित परिसर ओळखतो. अगदी जिथे ठेवले होते ते घरही”.
आणखी वाचा – 11 December Horoscope : मेष, कर्क राशीच्या लोकांसाठी बुधवारचा दिवस खास, धनलाभ अन् बढतीची शक्यता, जाणून घ्या…
दरम्यान, मुश्ताक खानकडून २ लाखाहून अधिक रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याच्याकडून खंडणी म्हणून एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यानंतर अपहरणकर्त्यांनी मुश्ताक आणि त्याच्या मुलाच्या बँक खात्यातून दोन लाखांहून अधिक रुपये काढले. जेव्हा अभिनेत्याने सकाळच्या अजानचा आवाज ऐकला तेव्हा त्याला समजले की जवळच एक मशीद आहे. अशा स्थितीत तो तेथून निसटला आणि पोलिसांच्या मदतीने घरी परतला.