बॉक्स ऑफिसवर ‘द वॅक्सिन वॉर’, ‘चंद्रमुखी २’ आणि ‘फुकरे ३’ असे तीन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट गेल्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला आले. या तीनही चित्रपटांना प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही चित्रपटांच्या कमाईचा आकडा वाढतोय, तर काहींच्या कमाईत घट होताना पाहायला मिळते. दरम्यान, या तीनही चित्रपटाच्या पहिल्या आठवड्याचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं. त्यापैकी ‘फुकरे ३’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. (Bollywood Movies Week 1 Box Office Collection)
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘फुकरे ३’ने ‘द वॅक्सिन वॉर’ व ‘चंद्रमुखी २’ या चित्रपटांना मागे टाकत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ‘फुकरे ३’ने पहिल्या आठवड्यात २८.३ कोटींची कमाई केली आहे. तर ‘चंद्रमुखी २’ने १७ कोटींची आणि ‘द वॅक्सिन वॉर’ने अवघ्या ३.२५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे, ‘चंद्रमुखी २’ आणि ‘द वॅक्सिन वॉर’ या दोन्ही चित्रपटांमध्ये अनेक स्टार कलाकारांचा भरणा असूनही बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात त्यांना अपयश आले आहे.
हे देखील वाचा – “आम्ही भ्रष्टाचार करणाऱ्यांना…” विशालच्या आरोपांवर सेन्सॉर बोर्डाचे उत्तर, म्हणाले, “चित्रपट निर्माते अजूनही…”
मृगदीप सिंग लांबा दिग्दर्शित ‘फुकरे ३’ चित्रपट ‘फुकरे’ सिरींजमधील तिसरा चित्रपट आहे. २०१३ मध्ये याचा पहिला भाग, २०१७ मध्ये दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंग, रिचा चढ्ढा आणि पंकज त्रिपाठी यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा आधीच्या भागांपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हे देखील वाचा – झी मराठीवरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ, म्हणाली, “प्रेम, आनंद अन्…”
तर ‘चंद्रमुखी २’मध्ये अभिनेत्री कंगना रानौत महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळाली असून ‘द वॅक्सिन वॉर’मध्ये तर नाना पाटेकर, पल्लवी जोशी, अनुपम खेर, गिरीजा ओक सारखे अनेक तगड्या कलाकारांची फौज होती. मात्र, या दोन्ही चित्रपटांना म्हणावे तितके यश आले नाही. त्यामुळे पुढील आठवड्यात हे चित्रपट प्रेक्षकांना किती आकर्षित करतात, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.