मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची लगीनघाई, ४० वर्ष जुनी आईची साडी नेसली आणि… ; ग्रहमखचे फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 6, 2026 | 11:19 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Apurva Gore Wedding Rituals Begins

मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची लगीनघाई

Apurva Gore Wedding Rituals Begins : मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लग्नसराईचं वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक लोकप्रिय कलाकार नव्या आयुष्याची सुरुवात करताना दिसत आहेत. अशातच आता छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर केलेली अभिनेत्री अपूर्वा गोरे हिच्याही लग्नाची चर्चा रंगू लागली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे अपूर्वा घराघरांत पोहोचली. काही दिवसांपूर्वीच तिने सोशल मीडियावर तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर आता ती अभिनेता अंशुमन जोशीसोबत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा: थलापती विजयच्या अफेअरच्या चर्चा खऱ्या, गर्लफ्रेंडसह एकत्र स्पॉट झाला आणि…; पत्नीचे आरोप ठरले खरे

अंशुमन जोशीने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या गाजलेल्या ‘शाळा’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून प्रेक्षकांसमोर पदार्पण केलं होतं. अभिनयाबरोबरच तो दिग्दर्शक, लेखक, चित्रलेखक आणि छायाचित्रकार म्हणूनही आपली ओळख निर्माण करत आहे. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. दरम्यान, लग्नापूर्वीचा पारंपरिक ग्रहमुख सोहळा नुकताच पार पडला. या खास सोहळ्याचे काही सुंदर फोटो अपूर्वाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिने एक भावुक पोस्ट लिहिली असून त्या पोस्टमुळे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलं आहे. (Apurva Gore Wedding Rituals Begins)

View this post on Instagram

A post shared by Apurva (@apurvagore)

अपूर्वा लिहिते, “ग्रहमुख विधीसाठी काय नेसावं हा पेच कधीच नव्हता. आईच्या लग्नातला ४० वर्षांपूर्वीचा शालू नेसायचाच, असं मी आधीच ठरवलं होतं. तो नेसल्यानंतर आईलाही खूप भरून आलं. ती खूप आनंदी होती आणि तिला माझं कौतुकही वाटत होतं, हे तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं. हे प्रेम, हा गोडवा आणि हे हळवे क्षण मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे.” आईच्या आठवणींशी जोडलेला तो खास शालू नेसून अपूर्वाने तिच्या आयुष्यातील हा सुंदर क्षण अधिकच खास केला. त्यामुळे तिच्या ग्रहमुख सोहळ्याचे फोटो आणि ही भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. (Apurva Gore Wedding Rituals Begins)

आणखी वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीची बिल्डरकडून मोठी फसवणूक, ४७ लाखांचा गंडा, नेमकं प्रकरण काय?

Tags: aai kuthe kaay karteApurva Gore Wedding Rituals Beginsentertainment
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
Simran Khedkar Mother

आठ वर्षांपासून सिंगल पॅरेंट, १२वी नापास आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईने ४३व्या वर्षी घेतलं स्वतःच घर, म्हणाली..

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.