Simran Khedkar Mother : ‘देवमाणूस-मधला अध्याय’ या मालिकेतील सिमरन खेडेकर नेहमीच तिच्या आर्या या भूमिकेमुळे चर्चेत राहिली. याशिवाय ती सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असलेली पाहायला मिळते. अशातच अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये सिमरनने एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने तिच्या आईने वयाच्या ४३व्या वर्षी स्वतःच घर घेतलं असल्याची गुडन्यूज दिली आहे. सिंगल पॅरेंट असलेल्या अभिनेत्रीच्या आईने खूप कष्टाने हे मोठं पाऊल उचललं. घराच्या गृह्प्रवेशाचे, पूजेचे फोटो शेअर करत तिने आईच्या संघर्षाबद्दल पोस्ट केली आहे.
सिमरनने पोस्ट शेअर करत असं म्हटलं की, “माझी आई बारावी नापास आहे. वयाच्या ४३ व्या वर्षी तिने स्वतःच्या हिंमतीवर हक्काच्या घराची खरेदी केली. आईने लग्नानंतर १६ वर्ष घर सांभाळलं आणि गेल्या दहा वर्षांपूर्वी घर सावरण्यासाठी तिने बिझनेस करायला सुरुवात केली.आज ती तिच्यासारख्या अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करुन देते. तसेच स्वतः पैसे कमावण्याने स्त्रियांच्या आयुष्यात किती बदल होतात आणि ते बदल स्वतःसाठी आणि समाजासाठी किती गरजेचे आहेत हे ती गरजू महिलांना पटवून देऊन त्यांना पैसे कमावण्याची संधी उपलब्ध करुन देते. मी आज प्रचंड अभिमानाने सांगते आहे की, माझी आई हे माझं पहिलं आणि एक मोठ्ठं प्रेरणास्थान आहे”.
आणखी वाचा – थलापती विजयच्या अफेअरच्या चर्चा खऱ्या, गर्लफ्रेंडसह एकत्र स्पॉट झाला आणि…; पत्नीचे आरोप ठरले खरे
तिने पुढे असं म्हटलं आहे की, “हे लिहिताना सुद्धा डोळ्यांत पाणी आहे. गेली आठ वर्ष माझी आई सिंगल पॅरेंट आहे. माझा मोठा भाऊ दिव्यांश हा आज चार्टर्ड अकाऊंटन्ट आणि मी अभिनय क्षेत्रात काम करते आहे ते फक्त आईच्या सपोर्ट आणि विश्वासामुळे. आईने दिलेले संस्कार/शिकवण किती महत्वाचे आहेत हे आज घरापासून दूर वेगळ्या शहरात राहताना कायम जाणवतात. जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे तिने दाखवून दिलं आहे आणि मला तिचा प्रचंड अभिमान, कौतुक आहे”.





