मंगळवार, सप्टेंबर 1, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 23, 2025 | 1:18 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Jay Dudhane Engagement

जय दुधाणेचा थाटामाटात पार पडला साखरपुडा

Jay Dudhane Engagement: मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसले. सोहम बांदेकर-पूजा बिरारी, मेघन जाधव -अनुष्का पिंपुटकर, तेजस्विनी लोणारी, सुरज चव्हाण ही कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकली. सगळ्यांनी अतिशय जल्लोषात आणि पारंपरिक अंदाजात लग्नसोहळा उरकला. तर काही अभिनेत्री लवकरच बोहल्यावर चढणार असल्याचं समोर आलं. यापाठोपाठ आता आणखी एक मराठमोळा अभिनेता लग्नबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे. ‘बिग बॉस मराठी’ फेम जय दुधाणे आता लवकरच बोहोल्यावर चढणार आहे. जयच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी जय दुधाणेच्या कुटुंबीयांनी जयसाठी खास केळवण समारंभाचं आयोजन केलं होतं.

आणखी वाचा: ६ फेब्रुवारीला उडणार ‘लग्नाचा शॉट’, नव्या मराठमोळ्या चित्रपटाची चर्चा, उत्सुकता वाढली

सध्या जय दुधाणेच्या घरी लग्नाची लगबग सुरु झाली असून नुकताच थाटामाटात साखरपुडा उरकत अभिनेत्याने चाहत्यांना आनंदाची बातमी आहे. यावेळी जयने काळ्या रंगाची शेरवानी तर त्याच्या त्याची होणारी पत्नी हर्षला पाटीलने सुंदर असा सिल्वर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. जय दुधाणेच्या साखरपुड्याला त्याच्या कुटुंबियांसह मित्र-मंडळी देखील उपस्थित होते. त्याच्या मित्र-मैत्रीणींनी त्याच्या साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याने व त्याच्या होणाऱ्या पत्नीने साखरपुड्यात सुंदर लूक केल्याचं व्हायरल फोटोजमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय एका फोटोमध्ये जय त्याच्या होणाऱ्या पत्नीला गुडघ्यावर बसून प्रपोज करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच जय दुधानेचं केळवण साजरं करण्यात आलं होतं. आता लवकरच जय-हर्षला लग्नबंधनात अडकणार आहेत. (Jay Dudhane Engagement)

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

जायच्या होणा-या पत्नीचं नाव हर्षला पाटील आहे. हर्षला पाटील ही लोकप्रिय सोशल मिडिया इन्फ्ल्यूएन्सर आणि प्रसिद्ध युट्यूबर म्हणूनही ओळखली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून जय दुधाणे आणि हर्षला पाटील एकमेकांना डेट करत होते. अशातच आता दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडला प्रपोज करत त्याने रिलेशनशिपमध्ये असल्याची जाहीर कबुली दिली. आता जय लग्नबंधनात केव्हा अडकणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Jay Dudhane Engagement)

आणखी वाचा: नोरा फतेहीचा अपघात, मद्यधुंद चालकाला अटक, आता अभिनेत्रीची प्रकृती कशी? ‘तो’ व्हिडीओ समोर येताच व्हायरल

Tags: bigg bossentertainmentJay Dudhane Engagementmarathi actor
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Paach Footacha Bachchan
Entertainment

कीर्तन विश्व उलगडणाऱ्या ‘पाच फुटाच्या बच्चन’चा टीजर समोर, दिसणार तगड्या कलाकारांची फौज

सप्टेंबर 1, 2026 | 11:20 am
 Badshah and Isha Rikhi announced Divorce
Entertainment

पाच महिन्यानंतच संसार मोडला, सुप्रसिद्ध गायकाचा घटस्फोट, लग्नापूर्वी चार वर्ष केलं एकमेकांना डेट अन्…

सप्टेंबर 1, 2026 | 7:58 am
Rajat Bedi Marathi Movie
Entertainment

बॉलिवूडनंतर रजत बेदींची मराठी सिनेमात एन्ट्री; ‘बंधू’ चित्रपटातून नवी इनिंग

ऑगस्ट 31, 2026 | 4:24 pm
Next Post
dnyanada ramtirthkar Wedding

ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, थेट मेहंदीचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, होणारा नवरा कोण?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.