रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा संपन्न, पहिला फोटो समोर, होणारा नवरा आहे सिनेविश्वात कार्यरत

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 23, 2025 | 5:53 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
dnyanada ramtirthkar marriage

ज्ञानदा रामतीर्थकरचा साखरपुडा संपन्न, पहिला फोटो समोर, होणारा नवरा आहे सिनेविश्वात कार्यरत

dnyanada ramtirthkar marriage : मराठी सिनेविश्वात सध्या लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसले. सोहम बांदेकर-पूजा बिरारी, मेघन जाधव-अनुष्का पिंपुटकर, तेजस्विनी लोणारी, सूरज चव्हाण, निमिष कुलकर्णी ही कलाकार मंडळी अगदी थाटामाटात लग्नबंधनात अडकली. यापाठोपाठ मालिकाविश्वातील दोन अभिनेत्रींनीं लवकरच बोहल्यावर चढणार असल्याची गुडन्यूज दिली. यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने थेट मेहंदीचे फोटो शेअर करत लग्नाची गोड बातमी दिली. ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील काव्या म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

अखेर ज्ञानदा व हर्षद यांचा साखरपुडा समारंभ पार पडला आहे. तिच्या साखरपुड्याचा पहिला फोटो समोर आला आहे. यावेळी दोघेही पारंपरिक अंदाजात दिसले. ज्ञानदा व हर्षद रिंग फ्लोन्ट करताना दिसले. साखरपुडयासाठी ज्ञानदाने साऊथ इंडियन गोल्डन जरीची साडी नेसली होती. दोघेही खूप सुंदर दिसत होते. अभिनेत्रीच्या घरी तिच्या साखरपुड्याची लगबग दिसली. मेहंदीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. अलिकडेच तिचे मेहंदी आणि नेल आर्टचे व्हिडीओ समोर आले आहेत. शिवाय तिने ‘ठरलं… कळवतो लवकरच!’ असं म्हणत एक खास व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामुळे ज्ञानदाचा होणारा नवरा कोण आहे, याविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

आणखी वाचा – ज्ञानदा रामतीर्थकरची लगीनघाई, थेट मेहंदीचे फोटो शेअर करत दिली गुडन्यूज, होणारा नवरा कोण?

View this post on Instagram

A post shared by DNYANA 🍀 (@dnyanadaramtirthkar)

ज्ञानदाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नवरा-नवरीचा हात दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने ‘#HD लव्ह’ असे म्हटले आहे. तसेच मेहंदी आणि नेलआर्टचे जे व्हिडीओ समोर आले आहेत, त्यातही #HD असा हॅशटॅग आहे. तिने नेल आर्ट करताना तिच्या नखांवरही H आणि D या अद्याक्षरांचे नक्षीकाम करवून घेतले आहे. ज्ञानदाने शेअर केलेल्या व्हिडीओमधील तिच्या होणाऱ्या नवर्याच्या हातांतील कड आणि सध्या त्याच्या प्रोफाइलवर असणाऱ्या फोटोंनुसार त्याच्या हातातील कडं सारखंच आहे त्यामुळे ती व्यक्ती कोण आहे याचा अंदाज बांधला जात आहे.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्याचा थाटामाटात पार पडला साखरपुडा, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष, फोटो समोर

View this post on Instagram

A post shared by DNYANA 🍀 (@dnyanadaramtirthkar)

हर्षद आत्माराम असे या तरुणाचे नाव असून तो सिनेमॅटोग्राफर आहे. अद्याप ज्ञानदाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव जाहीर केलेले नाही किंवा हर्षदने यासंदर्भात पोस्ट केलेली नाही. २०१९ पासून ज्ञानदाची आणि हर्षदची ओळख आहे. हर्षदच्या प्रोफाइलवरही ज्ञानदाचा एक जुना ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे. इतकंच नाहीतर 3 जुलै 2019 रोजी शेअर केलेल्या पोस्टमध्ये ज्ञानदाने असे लिहिले होते की, ‘तुझ्यामुळे सर्वकाही सर्वोत्तम आणि खास होऊन जाते… I Heart You’. या पोस्टमध्ये तिने हार्ट इमोजीही वापरली होती.

Tags: dnyanada ramtirthkarentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Sreenanda Shankar Announces Divorce

"आम्ही वेगळे झालो आहोत…", सोळा वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा घटस्फोट; म्हणाली, "कधीही लग्नाचं खरं चित्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.