रविवार, एप्रिल 26, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वोडकाची नदी वाहते, रशियन दारू पिऊन पडतात, उलट्या अन्…; सलमान खानच्या पार्टीचं धक्कादायक सत्य समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 14, 2025 | 5:01 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salman khan bollywood party

वोडकाची नदी वाहते, रशियन दारू पिऊन पडतात, उलट्या अन्...; सलमान खानच्या पार्टीचं धक्कादायक सत्य समोर

चंदेरी दुनियेतील कलाकार व त्यांचं राहणीमान याबाबत प्रत्येकालाच आकर्षण असतं. पुरस्कार सोहळा असो वा रेड कार्पेट कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज भूरळ पाडणारा असतो. इतकंच काय तर बॉलिवूड पार्ट्यांचीही नेहमीच चर्चा रंगताना दिसते. या पार्ट्यांमध्ये नक्की काय घडतं? याबाबतही अनेकांना उत्सुकता असते. कित्येकदा तर या पार्ट्यांमधून बाहेर येणारे कलाकार नशेत असल्याचं कॅमेऱ्यासमोरच दिसून आलं. आता एक मोठं सत्य समोर आलं आहे. सलमान खानच्या पार्टीमध्ये घडणाऱ्या घटनांबाबत दिग्दर्शकांनी खुलासा केला आहे. दारू ते रशियन मुली नक्की सलमानच्या पार्टीचं चित्र काय असतं? याविषयी त्यांनी सविस्तर सांगितलं. (Salman khan bollywood party)

सलमानच्या पार्टीत रशियन

‘लकी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विनय सप्रू व राधिका राव यांनी अनेक खुलासे केले होते. त्यांच्या या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री स्नेहा उल्लाल होती. रश युट्यूबला दिलेल्या मुलाखतीत दोन्ही दिग्दर्शकांनी सांगितलं की, “चित्रपट असणाऱ्या रशियन क्रुला आम्ही सलमानच्या पार्टीमध्ये न जाण्यास सांगितलं होतं. तुम्ही पार्टीला गेलात तर दुसऱ्या दिवशी सेटवर येणार नाही असं आम्ही बोलत होतो. मात्र ते ऐकले नाहीत”.

आणखी वाचा – “कसोटी सामन्यात तेच यशस्वी झाले जे…”, विराट कोहलीबाबत पुन्हा बोलली अनुष्का शर्मा, म्हणाली, “ज्याच्याकडे कथा…”

वोडका पाण्यासारखा वाहत होता

“रशियन क्रूने आम्हाला म्हटलं की, आम्ही रशियन आहोत. दारू पिण्याच्या बाबतीत आम्हाला कोणीच मागे टाकू शकत नाही. मग आम्हीही त्यांना काही पुढचं न सांगता ‘ऑल द बेस्ट’ म्हटलं. लक्षात ठेवा ही सलमान खानची पार्टी आहे, कमी समजू नका असंही सांगितलं. वोडका पाण्यासारखा त्या पार्टीमध्ये वाहत होता. लोक दारू पितच राहिले. वोडका पिण्यामध्ये आम्ही खूप सरस आहोत हे रुसच्या लोकांना सिद्ध करायचं होतं”.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

आणखी वाचा – “तो काही शाहिद आफ्रिदी नाही”, विराट कोहलीच्या निवृत्तीवर बोलताच जावेद अख्तर ट्रोल, असं काही म्हणाले की…

सलमान तरीही धडपडला नाही

पुढे ते म्हणाले, “रशियन क्रू मेंबर्स पायऱ्यांवर धडपडत होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे सेटवर आले तेव्हा काही लोक डोकं धरुन बसले होते. रशिनय लोक खूप शिस्तप्रिय असतात. अनप्रोफेशनल वागणं त्यांना पटत नाही. पण त्या पार्टीत काही भलतंच घडलं. सलमान मात्र एवढं सगळं होऊनही अजिबात धडपडला नाही. हेच बघून रशियन लोकांना आश्चर्य वाटलं. रशियन क्रूने आम्हाला सांगितलं की, आम्ही सगळे धडपत होतो, उलटी करत होतो. सलमानही आमच्याबरोबर दारू पित होता. मात्र त्याला काहीच झालं नाही”. रात्रभर पार्टी करुनही दुसऱ्या दिवशी तितक्याच जोमाने सलमान काम करण्यासाठी तयार होता. दिग्दर्शकांनी त्याच्या पार्टीमधील सगळं सत्य समोर आणलं.

Tags: bollywood newsentertainment newssalman khan
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 air conditioner health risks
Lifestyle

AC Side Effects : उन्हाळ्यात AC चा अतिवापर आरोग्यासाठी घातक, थकवा, डोकेदुखी आणि…

एप्रिल 26, 2026 | 4:00 pm
 Arijit Singh Net Worth
Entertainment

आलिशान कार, अपार्टमेंट आणि…; बॉलिवूड गायकाकडे आहे करोडो रुपयांची मालकी, लाइव्ह कॉन्सर्टसाठी घेतो मोठी रक्कम

एप्रिल 26, 2026 | 11:00 am
Raj Sharma Passes Away
Entertainment

प्रसिद्ध कॉमेडियनचे वयाच्या ५०व्या वर्षी निधन, बऱ्याच दिवसांपासून होते रुग्णालयात, मृत्यूचे कारण अस्पष्ट

एप्रिल 25, 2026 | 1:12 pm
Biplab Dasgupta death
Entertainment

वयाच्या ७५व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, रुग्णालयात नेतानाच वाटेत मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा

एप्रिल 25, 2026 | 11:58 am
Next Post
. Aamir khan sitaare zameen par boycott Turkey Connection

आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर येताच बॉयकॉटची मागणी, सुपरस्टार पुन्हा सुपरफ्लॉप?, तुर्की कनेक्शन अन्...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.