शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कालची आलेली मुलगी अशी कशी बोलते?”, जान्हवीने केलेल्या अपमानावर भडकलेली पॅडींची बायको, म्हणालेली, “आमचे संसार…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 4, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vishakha Subhedar talk about Paddy Kamble wife reaction when Janhavi Killekar insulted him in Bigg Boss Marathi 5

विशाखा सुभेदार यांनी जान्हवीने पॅडी कांबळे यांच्या केलेल्या अपमानावर त्यांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितले आहे.

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व अनेक कारणांनी चर्चेत राहिले. कलाकारांचे आपापसात होणार वाद, घरातील काम, गॉसिप्स यामुळे यंदाचा सीझन चांगलाच गाजला. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस’च्या घरात एक टास्क रंगला होता आणि या टास्कवेळी जान्हवी किल्लेकर आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे यांच्यात मोठा वाद झाला. “पॅडी दादा आयुष्यभर अशी ओव्हर अ‍ॅक्टिंग करून थकले आहेत”, असे वक्तव्य जान्हवीने केले होते. तसंच तिने पॅडी यांचा जोकर म्हणूनही उल्लेख केला होता. जान्हवीने केलेले हे वक्तव्य घरातील सदस्यांना अजिबात आवडले नव्हते. त्यांनी यावरुन जान्हवीला विरोध केला होता. तसंच जान्हवीच्या या वक्तव्यावरुन सिनेसृष्टीतील कलाकार मंडळींनीदेखील  संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले होते. (Paddy Kamble Wife Reaction)

पॅडी कांबळे यांची सहकलाकर व मैत्रीण विशाखा सुभेदार यांनीही त्यावेळी एक मोठी पोस्ट शेअर करत त्यांचा राग व्यक्त केला होता. पॅडी यांच्या या आपमानावर त्यांची मुलगी ग्रीष्मानेही पोस्ट शेअर केली होती. यावेळी पॅडी यांच्या पत्नीलाही वाईट वाटलं होतं. पॅडी यांच्या अपमानावेळी त्यांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती. याबद्दल विशाखा यांनी सांगितले आहे. आठवड्यात पॅडी कांबळेंचा ‘बिग बॉस मराठी’मधील प्रवास संपला. त्यानंतर पॅडी व विशाखा यांनी ‘इट्स मज्जा’शी खास संवाद साधला. या संवादात विशाखा यांनी जान्हवीने पॅडी यांच्या केलेल्या अपमानावर त्यांच्या पत्नीची काय प्रतिक्रिया होती याबद्दल सांगितले आहे.   

आणखी वाचा – Navri Mile Hitlerla : ऐजेंना प्रपोज करण्यासाठी लीलाची तयारी, एक दिवसही त्यांच्याशिवाय करमेना, प्रेमाचा स्वीकार करणार का?

याबद्दल बोलताना विशाखा यांनी असं सांगितलं की, “त्यावेळी मी पॅडीच्या बायकोबरोबर बोलले. तेव्हा ती अगदी हिरमुसली गेली होती. तेव्हा मी तिला विचारलं की काय झालं? तेव्हा त्याची बायको असं म्हणाली होती की, तो नाटकाच्या दौऱ्यावर जायचा तेव्हा आम्ही कशा राहायचो हे आम्हाला माहीत आहे. तो जे पैशांचं पाकीट आणायचा, त्या पैशात आम्ही घर कसं चालवायचो हेही आम्हाला माहीत आहे. त्या नाटकांच्या दौऱ्यांच्या पैशांवर आम्ही आमचे घर चालवले आहेत आणि त्यावर आमचे संसार उभे केले आहेत आणि ही कोण कालची मुलगी आली आहे जी त्याला जोकर आणि ओव्हर अ‍ॅक्टर म्हणते. इंडस्ट्रीमध्ये तो स्लॅपस्टीकचा बाप म्हणून ओळखला जातो. परदेशात त्याचे अनेक चाहते आहेत. त्याच्यावर इतके लोक प्रेम करतात आणि त्याला ही बाई अशी कशी काय बोलली? याबद्दल तिला खूप वाईट वाटलं होतं”.

आणखी वाचा – Govinda Discharge : स्वतःच्या हातूनच पायाला लागली होती गोळी, गोविंदाने सांगतलं तेव्हा नेमकं काय घडलं?, म्हणाला, “झटका लागल्यासारखं…”

दरम्यान, जुलै महिन्यात ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाला अगदी दणक्यात सुरुवात झाली होती. टीआरपीमध्येही हा कार्यक्रम अव्वल ठरला होता. तर नॉन-फिक्शन कार्यक्रमांमध्ये सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले गेले. अशातच आता हा शो प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत हा शो संपणार आहे. येत्या ०६ ऑक्टोबर रोजी या शोचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे.     

Tags: Janhavi Killekar insulted Paddy KamblePaddy Kamble Wife Reactionvishakha subhedar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
05 october 2024 Saturday daily horoscope Capricorn and Pisces people get benefits in business see the details

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मकर व मीन राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा, इतरांच्या नशिबात काय, जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.