सोमवार, सप्टेंबर 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कोणाची कशी मारायची हे…”, जाडेपणावर होणाऱ्या विनोदावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “राग येतो कारण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 18, 2023 | 10:10 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Vishakha Subhedar On Obesity

“कोणाची कशी मारायची हे…”, जाडेपणावर होणाऱ्या विनोदावर विशाखा सुभेदारचं स्पष्ट भाष्य, म्हणाली, “राग येतो कारण…”

अभिनेत्री विशाखा सुभेदारने आजवर तिच्या विनोदी अभिनय कौशल्याने चाहत्यांच्या मनात घर केलं. प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांच्या यादीत विशाखा सुभेदारच नाव आवर्जून घेतलं जात. छोटा पडदा गाजवणाऱ्या विशाखा सुभेदारला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला. विशेषतः जाड दिसण्यावरून अनेकांनी तिला ट्रोल केलं. जाड असण्यावरून केलेला विनोद कितीसा योग्य आहे याबाबत विशाखा सुभेदारने इट्स मज्जा या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे. (Vishakha Subhedar On Obesity)

“जाड असण्यावर सतत विनोद होत असेल तर राग येतो का?” असा प्रश्न विशाखाला विचारण्यात आला. यावर विशाखा म्हणाली, “हो राग तर येणारच. एखाद्या वर्मावर बोट ठेवणं हे कोणाला आवडणार आहे. एकदा, दोनदा, तीनदा विनोद ठिक आहे पण त्यापुढे सहन होऊ शकत नाही. शेवटी माणूस आहे. माणसाला लोभ, क्रोध सगळ्या भावना आहेत. त्यामुळे राग हा येणार. विनोद म्हणून किती टाळायचं? आत विनोदाचेही बरेच प्रकार आहेत. अपमान व विडंबन असा विनोदाचा प्रकार आहे.

आणखी वाचा – “आमच्या पप्पांनी गणपती आणला…” या ट्रेंडिंग गाण्यावर नारकर कपलचा भन्नाट डान्स, ठेका धरत म्हणाले, “आमच्या झीनं..”

यापुढे बोलताना विशाखा म्हणाली, “एखाद्याचा अपमान यावरच संपूर्ण डोलारा उभा असतो. हाच होणारा अपमान कुठेतरी घातक आहे. पूर्वी साधा-सरळ विनोद असायचा. एखाद्या विषयावर आधारित विनोद तयार व्हायचा. आता कोणाचा अपमान केल्याशिवाय कोणाला चैन पडत नाही. हा बोलला कसा नाही?, याची मारली कशी नाही? यावर बोलल्यानंतर चार लोक हसले की त्यांना बरं वाटतं. हाच प्रकार कुठेतरी कमी झाला पाहिजे. कलाकाराची कला ही समाजाला काहीतरी देणं लागतं.”

आणखी वाचा – जाडेपणामुळे हातून बऱ्याच भूमिका गेल्या असल्याची विशाखा सुभेदारला खंत, म्हणाली, “त्या फिगरची मी नाही म्हणून…”

विशाखा पुढे असंही म्हणाली की, “एखादा विचार, दृष्टीकोन समाजाला दिला पाहिजे. पण कोणाचा अपमान करुन विनोद केलेला नसावा. थोडी चव म्हणून अशाप्रकारचा विनोद ठिक आहे पण संपूर्ण जेवणच अपमानाचं नसावं. असं मला खूप वाटतं”.

Tags: entertainmentits majja exclusivevishakha subhedar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Suraj Chavan Baby
Entertainment

सूरज चव्हाण झाला बाबा, घरी आली गोड परी, लग्नाच्या वर्षभरातच दिली गुडन्यूज

सप्टेंबर 5, 2026 | 11:03 am
Leena Bhagwat Health Update
Entertainment

मराठी अभिनेत्रीचा आवाजाशी सामना, छोटीशी सर्जरीही झाली, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आणि…

सप्टेंबर 2, 2026 | 11:20 am
Kapil Honrao Social Media Break
Entertainment

तुलना, प्रेशर अन्…; मराठी अभिनेत्याचा मोठा निर्णय, सोशल मीडियाला केला रामराम, म्हणाला, “शर्यतीपासून…”

सप्टेंबर 2, 2026 | 9:45 am
Aali Mothi Shahani Teaser
Entertainment

हृता दुर्गुळे आणि सारंग साठ्ये यांच्या ‘आली मोठी शहाणी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

सप्टेंबर 1, 2026 | 1:04 pm
Next Post
Music Director Anirudh and Actress Keerthy Suresh Wedding

दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश 'जवान' फेम संगीतकाराबरोबर विवाहबंधनात अडकणार?, खुलासा करत म्हणाली, "तो माझा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.