गुरूवार, एप्रिल 23, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

घरात काम करणाऱ्या महिलेला विशाखा सुभेदारने घेऊन दिलेलं भाड्याने घर, आता त्याच व्यक्तीने खरेदी केला स्वत:चा २ बीएचके फ्लॅट, अभिनेत्री म्हणाली, “कष्ट करून…”

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 1, 2024 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Visakha Subhedar appreciated that a working woman bought a new house

घरात काम करणाऱ्या महिलेला विशाखा सुभेदारने घेऊन दिलेलं भाड्याने घर, आता त्याच व्यक्तीने खरेदी केला स्वत:चा २ बीएचके फ्लॅट, अभिनेत्री म्हणाली, "कष्ट करून..."

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली विनोदी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विशाखा समाजभानही जपतात, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. याबद्दलची एक पोस्ट विशाखा यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेबरोबरचा खास फोटो शेअर करत तिच्याबद्दलची एक कौतुकास्पद पोस्ट लिहिली आहे.

विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आज सकाळी माझे अंबरनाथचे घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा शोभाचा फोन आला. ती फोनवरून ताई खुशखबर आहे असं म्हणाली. (मला वाटलं मुलाच्या लग्नाची तारीख काढली असावी!) तिचा फोन येताच मी म्हटलं “काय गं??” तर ती म्हणली “ताई. २ बीएचकेचं घर घेतलं आहे.” ही बातमी ती अगदी खुप आनंदाने व उत्साहात सांगत होती. मलाही खुप आनंद झाला.

View this post on Instagram

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

आणखी वाचा – “दारु खूप प्यायचे आणि…”, अश्लील आरोपांनंतर ‘संस्कारी बाबूजी’ अलोक नाथ आता कोणत्या अवस्थेत आहेत?, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, “मला त्यांनी…”

यापुढे विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “अंबरनाथ पश्चिमेला थोडं स्लम परिसरात राहणारी, चौदा वर्षांपूर्वी शोभा माझ्याकडे रोज ४० मिनिटे चालत कामाला यायची. तिची धावपळ व पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घराजवळ मी भाडयाने घर घेऊन दिलं होतं. तर वाचलेल्या वेळेत तिने अजून एक ठिकाणी काम धरलं, पोरं मोठी झाली आणि मग त्यांचं शिक्षणही झालं”.

आणखी वाचा – मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय होतं?, अंबानी कुटुंबियांचं कचरा कुठे फेकला जातो?, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

यापुढे त्यांनी या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, “तिचा हा प्रवास पहिला की, मलाच खुप समाधान मिळतं. तिच्या सगळ्या प्रवासाची मी साथीदार व साक्षीदार आहे. माझ्याकडे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली की मला खूपच कौतुक वाटतं. मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर. परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्या कडून ते करवून घेतलं हे त्या ईश्वराचे आभार आणि शोभाचे खुप कौतुक”. दरम्यान, विशाखा यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी विषाखा सुभेदार यांचे कौतुकही केले आहे.

Tags: entertainment newsmarathi actressmarathi entertainment newsMarathi newsVisakha Subhedarमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन बातमीविशाखा सुभेदार
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

veen doghatli hi tutena serial
Entertainment

भयंकर ऊन, घामाच्या धारा अन्…; ‘वीण दोघांतली…’च्या कलाकारांनी ४५ मिनिटांत पूर्ण केलं शूट, बहरणार रोमान्स

एप्रिल 22, 2026 | 2:50 pm
Puja Banerjee pregnant
Entertainment

टेलिव्हिजनची ‘पार्वती’ दुस-यांदा प्रेग्नंट, पळून जाऊन वयाच्या १५व्या वर्षी केलेलं लग्न, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

एप्रिल 22, 2026 | 1:00 pm
Aishwarya Rai updates
Entertainment

“आई ती शेवटी आईच”, एअरपोर्टवर लेकीला घ्यायला पोहोचले ऐश्वर्या-अभिषेक, आराध्याचे फोटोही काढले आणि….

एप्रिल 22, 2026 | 11:00 am
Deepali Sayed Home Coming
Entertainment

घरापासून लांब, मानसिक ताण आणि…; १०० दिवसांनी घरी परतताच दीपाली सय्यदच जंगी स्वागत, म्हणाली, “उंबरठ्यावर…”

एप्रिल 22, 2026 | 9:55 am
Next Post
Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding

पूजा सावंतने जपली मराठमोळी परंपरा, पारंपरिक पद्धतीच्या मंगळसूत्राला दिली पसंती, डिझाइन आहे फारच खास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.