बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय होतं?, अंबानी कुटुंबियांचं कचरा कुठे फेकला जातो?, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 29, 2024 | 6:16 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Mukesh Ambani's house antilia garbage use see the details

मुकेश अंबानी यांच्या घरातील कचऱ्याचं नेमकं काय होतं?, अंबानी कुटुंबियांचं कचरा कुठे फेकला जातो?, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

सोशल मीडियावर जर कुणाला एखाद्या गोष्टीची चुणूक लागली तर नेटकरी मंडळी त्या गोष्टीच्या अक्षरश: मागे लागतात. ती गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे त्या गोष्टीची लगेच बातमीही होते अन् ती गोष्ट रातोरात सोशल मीडियावर व्हायरलही होते. सोशल मीडियावर सध्या मुकेश अंबानीच्या लेकाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अंबानीच्या लेकाच्या लग्नाची जय्यत तयारी सुरु याचे काही फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याबद्दलच्या अनेक बातम्या सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अशातच आता सोशल मीडियावर अंबानीबद्दल आणखी एक बातमी व्हायरल होत आहे ती म्हणजे अंबानीच्या घरातल्या कचऱ्याची. अंबानींच्या घरातील कचरा नेमका जातो कुठे? याबद्दल सोशल मीडियावर अनेकांना प्रश्न पडला आहे. चला तर जाणून घेऊयात अंबानीच्या घराच्या कचऱ्याबद्दल आणि त्या कचऱ्याच्या विघटनाबद्दल. भारतातील सर्वात मोठ्या घरांमध्ये मुकेश अंबानी यांच्या घराचे नाव घेतले जाते. त्यांच्या घरातील कचऱ्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. त्यांच्या घरातील कचरा कशासाठी वापरला जातो हे सांगण्यात आले आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की त्यांच्या घरातील कचऱ्यापासून वीज तयार होते, जी फक्त त्यांच्या घरासाठीच वापरली जाते.

View this post on Instagram

A post shared by Nita Mukesh Ambani Cultural Centre (@nmacc.india)

आणखी वाचा – लग्नानंतर बायकोसह पुण्यातील ‘या’ ठिकाणी फिरायला गेला प्रथमेश परब, फोटोही केला शेअर, म्हणाला, “थोडासा वेळ काढून…”

अंबानींच्या घरातील कचरा फेकून दिला जात नाही, तर त्याचा वापर वीज निर्मितीसाठी केला जातो. सर्वप्रथम सुका आणि ओला कचरा वेगळा केला जातो, त्यानंतर वीजनिर्मिती केली जाते. त्यांच्या घरात एका खास यंत्रणेद्वारे कचऱ्यापासून वीज तयार केली जाते, असे सांगण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या घरात विजेचा सर्वाधिक वापर होतो. त्यामुळे या घरातील कचऱ्यापासूनच या घरात वीजनिर्मिती केली जाते.

आणखी वाचा – पितळेची भांडी, हाताने विणलेल्या वस्तू अन्…; पूजा सावंतच्या लग्नातील रुखवत तुम्ही पाहिलात का?, अगदी साध्या पण सुंदर वस्तूंनी वेधलं लक्ष

अंबानींच्या घराचे नाव ‘अँटिलिया’ असून भारतातील सर्वात मोठ्या घरांमध्ये मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’चे नाव घेतले जाते. २७ मजली घरात एकूण ६०० नोकर राहतात जे या घराची देखभाल करतात. तसेच ‘अँटिलिया’ हे निवासस्थान जगभरातील लोकांचे आकर्षण आहे.

Tags: 'अँटिलिया'Ambani HouseAntiliabollywood newsentertainment newsmukesh ambaniअंबानी घरबॉलिवूड बातमीमुकेश अंबानी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
"दारु खूप प्यायचे आणि...", अश्लील आरोपांनंतर 'संस्कारी बाबूजी' अलोक नाथ आता कोणत्या अवस्थेत आहेत?, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, "मला त्यांनी..."

"दारु खूप प्यायचे आणि...", अश्लील आरोपांनंतर 'संस्कारी बाबूजी' अलोक नाथ आता कोणत्या अवस्थेत आहेत?, सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, "मला त्यांनी..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.