शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss 17 : “माझ्या पत्नीशी…”, बायकोला तुच्छ वागणूक दिल्यानंतर विकी जैनला समजली स्वतःची चूक, म्हणाला, “अधिक चांगलं वागणं…”

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 15, 2024 | 12:32 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Vicky jain regrets he did not treated his wife ankita lokhande politely see the details

"माझ्या पत्नीशी...", बायकोला तुच्छ वागणूक दिल्यानंतर विकी जैनला समजली स्वतःची चूक, म्हणाला, "अधिक चांगलं वागणं..."

Bigg Boss Latest Updates : ‘बिग बॉस १७’ च्या घरात पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत राहिलेले स्पर्धक  म्हणजे अंकिता लोखंडे व तिचा पती विकी जैन. हे दोघे शोच्या पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत राहिले आहेत. अंकिता-विकी यांच्यात अनेकदा अनेक कारणावरून खटके उडाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. अंकिताला तिच्या नवऱ्याच्या वाईट वागणुकीलादेखील समोरे जावे लागले असल्याचे या शोमधून पहायला मिळाले आहे.

अशातच नुकत्याच झालेल्या एका भागामध्ये विकीने एक अशी गोष्ट सांगितली. ज्यावरुन त्याला त्याची चूक कळली आहे आणि त्याचा त्याला पश्चात्तापदेखील झाला आहे. नुकत्याच झालेल्या एका भागात ड्रेसिंग रूममध्ये अंकिता लोखंडेने आयशा खानला “बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्यापूर्वी तिला तिच्यात कोणता बदल करायला आवडेल?”, असा प्रश्न विचारला. ज्यावर उत्तर देत तिने असे म्हटले की, “ती एक दिवसापूर्वे घडलेली घटना बदलू इच्छिते.” यावेळी ड्रेसिंग रूममध्ये अंकिता, आयेशासह  मुनवर फारुकी व विकी जैनहेदेखील होते.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

हेही वाचा – Bigg Boss 17 : “त्यांचं नातं खराब…”, अंकिता लोखंडे व विकी जैनच्या नात्यावर उषा नाडकर्णींचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या, “अधिक समस्या…”

मुन्नवरनेही यावेळी असे म्हटले की, “रागाच्या भरात माझ्याकडून बाटली फोडल्याची घटना घडली होती, त्यामुळे संधी मिळाली तर ती एक घटना मला बदलायला आवडेल.” यावर अंकिताने त्याला पुन्हा याव्यतिरिक्त आणखी काय बदल करायला आवडेल असे विचारले, यावर त्यानेही “याशिवाय दुसरे काही बदलायचे नाही.” असे उत्तर दिले. यानंतर मुन्नवर विकीला त्याच प्रश्नाचे उत्तर विचारतात. यावर विकी उत्तर देत असे म्हणतो की, “मी माझ्या पत्नीशी अधिक चांगले वागायला हवे होते. याशिवाय मला माझ्या खेळात काहीही बदल करायला आवडणार नाही”.

हेही वाचा – “तुझा घटस्फोट झाला आहे का?”, जुई गडकरीला चाहत्याने विचारला थेट प्रश्न, अभिनेत्री म्हणाली, “अहो लग्न…”

दरम्यान, विकीच्या या वक्तव्यावर अंकिता हसली. विकी-अंकिता यांच्या याआधीच्या एका संभाषणात विकीने असे म्हटले होते की, अंकितामुळे त्याने अनेकांशी अंतर निर्माण केले असून तिच्यामुळे त्याने अनेकांशी संवाद कमी केला असल्याचे म्हटले होते. तसेच गेल्या आठवड्यात अंकीताने मन्नारा व विकी यांच्यातील वाढत्या जवळीकीबद्दल त्याचबरोबर घरातील विकीच्या इतरांबद्दलच्या जवळीकीबद्दल कधीही हेवा वाटला नसल्याचे म्हटले. 

Tags: Actress Newsankita lokhandebigg bossbigg boss 17bigg boss newsBollywood entertainmentbollywood newsentertainment newsvicky jainअंकीता लोखंडेअभिनेत्री बातमीबिग बॉसबिग बॉस 17बिग बॉस बातमीबॉलिवूड बातमीबॉलिवूड मनोरंजनबॉलिवूड मनोरंजन बातमीमनोरंजन बातमीविकी जैन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

javed Akhtar on south film industry
Entertainment

“बॉलिवूड फक्त इंग्रजीचं स्वप्न बघत आहे”, जावेद अख्तर यांनी हिंदी इंडस्ट्रीला डिवचलं, साऊथ चित्रपटांशी तुलनाही केली अन्…   

जून 5, 2025 | 6:45 pm
Preity Zinta Networth
Entertainment

चित्रपटांपासून दूर तरीही IPL मध्ये पंजाब किंग्सच्या मालकिणीने कसं उभारलं साम्राज्य, करोडोंची उलाढाल करते आणि…

जून 5, 2025 | 6:00 pm
Sajna Movie Song
Entertainment

प्रेमाच्या नाजूक भावना टिपणारं ‘सजना’ चित्रपटातील ‘रात सजनाची’ गाण्याची हवा, हळवी बाजू मांडत जिंकली प्रेमीयुगुलांची मनं

जून 5, 2025 | 5:48 pm
Vibhu Raghave Death
Entertainment

“आता वेदना होणार नाहीत”, कॅन्सरमुळे मृत्यू झालेल्या विभू राघवसाठी अभिनेत्री भावुक, अंत्यसंस्कारावेळीही ढसाढसा रडताना दिसली आणि…

जून 5, 2025 | 5:18 pm
Next Post
Amitabh Bachchan

राम मंदिरच्या उद्घाटनापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत खरेदी केली 'इतक्या' कोटींची जमीन, म्हणाले, "माझे घर बांधण्यास…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.