प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी सिनेमागृहांत प्रदर्शित झालेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये ते दिसले होते. त्यात त्यांची व शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर त्यांच्या तब्येतीसंदर्भात अनेक बातम्या आल्या होत्या. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी याचे खंडन केले. अशातच धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक शायरी म्हणत आपल्या तब्येतीबाबत व्यक्त झाले आहे. (Dharmendra new video about his health)
अभिनेते धर्मेंद्र सध्या त्यांचा लोणावळा येथील फार्महाऊसवर असून त्यांच्या बहुतांश वेळ ते याच फार्महाऊसवर घालवतात. ते तिथे अनेकदा गाडी चालवताना, शेतात भाजीपाला पिकवताना व व्यायाम करताना दिसले. त्याचबरोबर ट्विटर अकाउंटवर फोटोज व व्हिडिओज शेअर करत त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. असाच एक व्हिडिओ नुकताच त्यांनी ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी एक शायरी म्हटली आहे. ज्यातून ते त्यांच्या तब्येतीबद्दल व्यक्त झाले आहे.
हे देखील वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा
ते या व्हिडिओमध्ये म्हणाले की, “तो सुनिए जनाब मैं क्या लिखता हूं… आंखें रंग नहीं पहचानतीं, कहता है ले चल चमन में। कोई समझाए दिल-ए-नादान को, अब तो पैरों में भी दम नहीं है।”. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी “ऐ हकीकत-ए-जिंदगी, मैं जवान हूं अभी” असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ त्यांनी शेअर करताच चाहते चिंतित झाले आहे. कमेंटद्वारे धर्मेंद्र यांना स्वतःची काळजी घेण्याचे सांगितले आहे.
Ae haqeeqat e zindagi………main jwaan hoon abhi ???? pic.twitter.com/wvZwQ6VKEk
— Dharmendra Deol (@aapkadharam) September 26, 2023
हे देखील वाचा – “ही तर हद्द झाली…”, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच परिणीती चोप्रा ट्रोल, नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं, “ही प्रेग्नेंट…”
मध्यंतरी धर्मेंद्र यांच्या तब्येतीबद्दल अनेक बातम्या आल्या होत्या. त्यांच्या उपचारासाठी मुलगा सनी देओलसोबत ते अमेरिकेला जाणार असल्याचे तेव्हा सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या तब्येतीच्या बातमीचे खंडन करत ते पूर्णपणे ठीक असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र पहिली पत्नी प्रकाश कौर आणि मुलगा सनी देओलसह अमेरिकेत सुट्टी घालवण्यासाठी गेले होते.