शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची घोषणा

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 26, 2023 | 4:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Waheeda Rehman honored Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award

ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली आहे. (Waheeda Rehman honored Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award)

१९३८ मध्ये तामिळनाडूतील चेंगलपेट गावात जन्मलेल्या वहिदा रेहमान यांनी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरवात केली आहे. मात्र त्यांना खरी ओळख मिळाली ती हिंदी चित्रपटांमधून. देव आनंद, गुरुदत्त, राज कपूर यांसारख्या अनेक दिग्गज नटांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘गाईड’, ‘सीआयडी’, ‘चौधवी का चाँद’, ‘खामोशी’, ‘नील कमल’, ‘तीसरी कसम’, ‘रंग दे बसंती’ आणि ‘राम और श्याम’ अशी अनेक चित्रपट त्यांची गाजली. आपल्या ५ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. त्याचबरोबर त्यांना पद्मश्री व पद्मभूषण या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हे देखील वाचा – ‘फर्रे’चा टीझर अखेर प्रदर्शित, सलमान खानची भाची अलिजेहचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, व्हिडीओ पाहिलात का?

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या नावाची घोषणा करताना एक ट्विट लिहिलं आहे. ते यात म्हणाले, “मला ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना त्यांच्या भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात येणार आहे, हे जाहीर करताना खूप आनंद होत आहे.”

I feel an immense sense of happiness and honour in announcing that Waheeda Rehman ji is being bestowed with the prestigious Dadasaheb Phalke Lifetime Achievement Award this year for her stellar contribution to Indian Cinema.

Waheeda ji has been critically acclaimed for her…

— Anurag Thakur (@ianuragthakur) September 26, 2023

हे देखील वाचा – “जेव्हा पैसे खूप कमी मिळतात तेव्हा…”, प्रसाद ओक-गौरव मोरेचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; म्हणाला, “जगातील अंतिम सत्य…”

“वहिदा रेहमान यांना हिंदी चित्रपटातील भूमिकांसाठी समीक्षकांकडून शाबासकीची थाप मिळाली आहे. ५ दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक भूमिका उत्तमरीत्या साकारली आहेत. त्यामुळेच ‘रेशमा और शेरा’ चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित वहिदा रहमान यांनी भारतीय नारीच्या समर्पण, वचनबद्धता आणि सामर्थ्याचे दिलं आहे. जे तिच्या कठोर परिश्रमाने व्यावसायिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीची सर्वोच्च पातळी गाठू शकते. मी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या समृद्ध कार्याला नम्रपणे अभिवादन करतो, जो आमच्या चित्रपट इतिहासाचा अंगभूत भाग आहे.”, असं ते या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

Tags: bollywood actressDadasaheb Phalke Lifetime Achievement AwardWaheeda Rehman
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Varsha usgaonker welcoming actress in her house

वर्षा उसगावकरांच्या गोव्यातील घरी पोहोचली ‘सुख म्हणजे…' मालिकेतील अभिनेत्री, आतून इतकं सुंदर आहे अभिनेत्रीचं घर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.