बॉलिवूडकरांच्या प्रेमकथा या कायमच चर्चेत असतात. अशातच एक लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली. ही जोडी म्हणजे अभिनेत्री परिणीती चोप्रा व आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा. नुकत्याच या जोडप्याने राजस्थानमधील उदयपूर येथील लीला पॅलेसमध्ये थाटामाटात विवाह सोहळा उरकला. दोघांच्या लग्नाला अनेक बॉलिवूडकरांनी हजेरी लावली होती. (Parineeti Chopra Troll)
२३ सप्टेंबरला हळदी समारंभ तसेच मेहंदी व संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तर २४ सप्टेंबरला उपस्थित मान्यवर, मित्र परिवार व कुटुंबियांच्या साथीने त्यांचा विवाह संपन्न झाला. अगदी थाटामाटात त्यांचा हा विवाह सोहळा झाला. दरम्यान सोशल मीडियावर त्यांच्या लग्न सोहळ्याचे तसेच संगीत सोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले. अनेकांनी त्यांच्या या शाही विवाहसोहळ्याचे कौतुक केले. मात्र लग्नानंतर पाहिल्याची दिवशी या जोडीला ट्रोलिंगचा सामना ही करावा लागला.
लीला पॅलेसमधून बाहेर पडताना, परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा यांना पापाराझींनी हेरले. राघवने स्टायलिश ब्लॅक शेड्स असलेला चष्मा, पांढरा शर्ट आणि ब्लू डेनिम घातली होती. तर दुसरीकडे, परिणीतीने लूज-फिटिंग जीन्ससह एक ऑफ-शोल्डर गुलाबी कफ्तान घातला होता, तसेच तिच्या हातात गुलाबी चुडादेखील पाहायला मिळाला.
आहे.
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर काही क्षणातच सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली. नेटकऱ्यांनी या महत्त्वाच्या दिवशी परिणितीला तिच्या अनौपचारिक पोशाखाबद्दल ट्रोल केले, एकाने कमेंट करत म्हटलं की, “लग्नानंतर लगेचच तिने जीन्स का घातली? ड्रेस तरी घालायला हवा होता.” तर आणखी एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं आहे, ““याच्यापेक्षा कुलाबा कॉजवेवरून घेतलेले कपडे चांगले असतात.”, “ही तर हद्द झाली…”, लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच परिणीती चोप्रा ट्रोल, नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटलं, “ही प्रेग्नेंट…”