बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते देव आनंद आज आपल्यात नसले, तरी त्यांचे जगभरात चाहते आहेत. देव आनंद यांनी आपला अभिनय व अंदाजाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. जुहूमध्ये त्यांचं आलिशान घर असून त्या घरात त्यांनी आपल्या आयुष्याची ४० वर्ष घालवली आहे. मात्र आता देव आनंद यांचं हे आलिशान घर चर्चेत आलं आहे. कारण देव आनंद यांनी ज्या घरात आपलं अवघं आयुष्य घालवलं आहे, ते घर आता जमीनदोस्त होणार आहे. (Dev Anand House was Sold)
दिवंगत अभिनेते देव आनंद यांच्या १९५० साली बांधण्यात आलेल्या जुहूमधील आलिशान घराची नुकतीच विक्री झाली आहे. हिंदुस्थान टाईम्सच्या माहितीनुसार, देव आनंद यांचा जुहू येथील बंगला एका रिअल इस्टेट कंपनीने विकत घेतला असून तब्बल ४०० कोटींमध्ये या घराची विक्री झाली आहे. हे घर तब्बल ७३ वर्ष जुने असून लवकरच या जागेवर २२ मजली टॉवर उभी राहणार आहे. दरम्यान, या विक्रीचा सर्व करार झाला असून कागदोपत्री काम सुरू झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
हे देखील वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर गणरायासाठी बनवला नयनरम्य देखावा, मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत म्हटलं, “माझं भाग्य की…”
या बंगल्यात देव आनंद यांनी त्यांच्या पत्नी कल्पना कार्तिक व मुले सुनील आणि देविना यांच्याबरोबर अनेक वर्ष वास्तव्य करत होते. मात्र, सध्या या घरात कोणी वास्तव्य करत नसल्याने त्यांच्या मुलांनी या घराची विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. असं सांगितलं जातं की, देवानंद यांनी १९५० मध्ये हे घर जेव्हा बांधलं होतं, त्यावेळी तो परिसर जास्त लोकप्रिय व विकसित नव्हता. पण आता हा परिसर सर्वात पॉश आणि महागड्या जागांपैकी एक आहे. विशेष म्हणजे याच परिसरात माधुरी दीक्षित व डिंपल कपाडिया यांचीदेखील आलिशान घरे आहेत.
हे देखील वाचा – “नेमकं काय रिकामं आहे?”, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा नरेंद्र मोदींना प्रश्न, म्हणाले, “२०१४ पासून…”
दरम्यान, देव आनंद यांचा मुलगा सुनील अमेरिकेत आहे. तर मुलगी देविना तिच्या आईसोबत उटी येथे राहते. अभिनेत्याच्या बंगल्याची देखभाल करण्यासाठी कुणीच नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.