महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचीच सर्वत्र चर्चा असलेली पाहायला मिळते. टेन्शनवरची मात्रा म्हणजे महाराष्ट्राची हास्यजत्रा या टॅगलाईनने हास्यजत्रेला अचूक न्याय मिळवून दिला आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. जणू हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच बनला आहे. हास्यजत्रेने आजवर रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. हा कार्यक्रम पडद्यावर आपण पाहतो त्यातील स्किट्स पाहतो, त्यावेळी या स्कीटमागे घेतल्या जाणाऱ्या अपार कष्टांची मेहनतीची आपल्याला जाणीवही सेटवरील मंडळी भासू देत नाहीत. (Vanita Kharat Shares Goodnews)
कलाकार मंडळींमुळे हा कार्यक्रम नेहमीच अव्वल ठरतो. अशातच प्रेक्षकांना हसवणाऱ्या या कार्यक्रमातील लोकप्रिय चेहरा म्हणजे वनिता खरात. कोळीवाड्याची रेखा म्हणून वनिताला संपूर्ण महाराष्ट्रात ओळखलं जात. वनिताने चार महिन्यांपूर्वीच सुमित लोंढे याच्यासोबत लगीनगाठ बांधली.
पाहा वनिता आणि सुमित देणार चाहत्यांना धक्का (Vanita Kharat Shares Goodnews)
वनिता खरात आणि सुमित लोंढे हे गेली दोन वर्ष एकमेकांना ओळखत आहेत. चार महिन्यांपूर्वी हे दोघे विवाहबंधनात अडकले. सोनी मराठी वाहिनीवर येणाऱ्या तुझं माझं सपान या मालिकेच्या प्रमोशन अंतर्गत वनिता आणि सुमितने त्या दोघांनी मिळून पाहिलेलं स्वप्न नेमकं काय आहे याचा उलगडा केला आहे. प्रत्येक जोडप्याचं भविष्याला घेऊन एक स्वप्न असत आणि ते स्वप्न ते जोडपं पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्नही करत, असंच वनिता आणि सुमितने पाहिलेलं स्वप्न समोर आलं आहे.(Vanita Kharat Shares Goodnews)
वनिता आणि सुमित यांनी एकत्र पाहिलेलं स्वप्न समोर आलंय. यांत त्यांनी म्हटलंय की, गेली दोन वर्षे आम्ही एकमेकांना ओळखतोय, आणि चार महिन्यांपूर्वीच आम्ही विवाहबंधांत अडकलो. प्रत्येक कपलचं असं एक स्वप्न असत तसस्वप्न आम्ही देखील पाहिलंय. आम्हाला व्यवसाय सुरु करायचा आहे, आणि तो आम्ही लवकर सुरु करण्याच्या प्रयत्नात आहोत, आणि हे प्रयत्न आमचे मनापासून आहेत, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही ना काही चढ उतार येतच असतात, मात्रा आम्ही मनापासून हे स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे लागलो आहोत.(Vanita Kharat Shares Goodnews)
हे देखील वाचा – भाऊचं कोकणातलं घर तुम्ही पाहिलंत का?
त्यानंतर वनिता सुमितकडे पाहत म्हणतेय की, सुमितबद्दल सांगायचं म्हणजे सुमित फार जिद्दी आहे, एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय तो राहत नाही. त्याचा हा स्वभाव मला फार आवडतो. असं म्हणत सुमित आणि वनिताने पाहिलेल्या स्वप्नाबाबत त्यांनी प्रेक्षकांना सांगितलं आहे.
