प्रत्येक घराची अशी गोष्ट असते, सर्वसामान्य माणूस असो वा एखादा कलाकार स्वतःच हक्काचं घर घेण्यासाठी प्रत्येकाचा संघर्ष हा नशिबी आहेच म्हणावा लागेल. अशातच मराठी सिनेविश्वातली एक लोकप्रिय जोडपं म्हणजे तुषार देवल आणि स्वाती देवल. आपल्या अभिनयातून आजवर स्वातीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहेच तर तुषारच्या वादनाच्या कौशल्याने त्यानं अनेकांची मन जिंकली आहेत.(swati deval and tushar deval incidence)
सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करून तुषार आणि स्वाती नेहमीच चर्चेत असतात. एकमेकांसोबतचे रील्स व्हिडीओ शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सिनेविश्वात काम करत असताना कोणताही वारसा या दोन्ही कलाकारांच्या पाठीशी नसताना या दोघांनी स्वबळावर सिनेविश्वात आपलं स्थान पक्कं केलं. स्ट्रगल करत करत जम बसवू पाहणाऱ्या या जोडप्याने जेव्हा घर घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा बऱ्याच अडचणींवर मात करून त्यांनी घर घेण्याचा निर्णय घेतला.
पाहा स्वाती आणि तुषारने कसे फेडले घराचे हफ्ते (swati deval and tushar deval incidence)
मात्र सिनेमाविश्वात काम करत असल्याने कधी काम मिळत तर कधी कधी बरेच दिवस काम असत अशावेळी ईएमआय भरताना तारांबळ झाली तर त्यावर कसा तोडगा काढायचं याच उत्तर स्वाती आणि तुषार यांनी itsmajja च्या माझ्या घराची गोष्ट या सेगमेंटमध्ये सांगितलं आहे. चला तर पाहूया स्वाती आणि तुषार यांनी त्यांचे ईएमआय कसे फेडले.(swati deval and tushar deval incidence)
हे देखील वाचा – वनिता आणि सुमित प्रेक्षकांना देणार सुखद धक्का
याबाबत बोलताना स्वाती म्हणाली की, ‘मला आणि तुषार ला एक सवय आहे की, माझ्या वाढदिवसाला, त्याच्या वाढदिवसाला आणि आता आमच्या लेकाच्या वाढदिवसाला आम्ही जमेल तस १, १ ग्रॅम सोनं घेऊन ठेवलं, आणि ती साठवण याच अनुषंगाने आहे की, चुकून कधी घराचे हफ्ते फेडताना काही प्रॉब्लेम आले तर ही ठेवण वापरायची. शिवाय घर घेताना आम्ही एक सवय लावूनच घेतली की, पुढच्या महिन्याचे पैसे आधीच साठवायला घ्यायचे, आणि जवळ असेल एखादी रक्कम तर ती आपली नाहीच असं समजून बाजूला काढून ठेवायची.’