प्रसिद्ध मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी रंगभूमी व रुपेरी पडद्याच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना हसवत आलेले आहेत. एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेले वैभव यांनी मुंबईत येऊन विविध नाट्यस्पर्धांमध्ये सहभागी झाले. त्या सर्व नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची झलक सर्वांना दाखवली. ‘वाडा चिरेबंदी’, ‘करून गेलो गाव’, ‘अलबत्या गलबत्या’ यांसारखी अनेक नाटकं त्यांची गाजली. शिवाय, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘माझे पती सौभाग्यपती’ ही मालिका व ‘टाईमपास’ सारख्या चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. केवळ अभिनयातच नाही, तर गायन, सूत्रसंचालन व विनोदी कलाकार म्हणून त्यांनी चांगलं नाव कमावलं. (Vaibhav Mangale request to his fans)
वैभव मांगले हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय राहतात. त्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांसह विविध फोटोज व व्हिडीओज शेअर करतात. शिवाय, ते विविध मुद्द्यांवरही परखडपणे भाष्य करताना दिसतात. त्यांचे काही मत कधी नेटकऱ्यांच्या पसंतीस पडतात, तर कधी खटकतात. अशीच एक पोस्ट सध्या व्हायरल होत असून ज्यामुळे ते ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेले आहे.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला, त्यानिमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई होताना दिसते. तर, काही ठिकाणी आतापासूनच फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसत आहे. पण, यंदा मुंबईतील प्रदूषणात प्रचंड वाढ होताना दिसत असल्याने अनेक जण यंदाच्या दिवाळीत फटाके न फोडण्याचे आवाहन करत आहे. अभिनेते वैभव मांगले यांनी नुकतंच एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी चाहत्यांना फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे. ते या पोस्टमध्ये म्हणाले, “मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित आहे. त्यामुळे कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करू नका ही माझी कळकळीची विनंती आहे.”
हे देखील वाचा – “मराठी मुलगा बिझनेस करतोय याचं…”, सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले, “आई-बापाच्या जीवावर…”
वैभव यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या. मात्र, अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे. एक नेटकरी यावर म्हणाला, “का हिंदूंच्याच सणाला बर प्रदूषण आठवलं तुम्हाला.”. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “थोडे दिवस एखाद्या दुसऱ्या देशात शिफ्ट व्हावं, आम्ही बघू सण कसे करायचे”. तर आणखी एक नेटकरी म्हणाला, “कलाकार आहात तर कुठल्या गोष्टीला महत्व द्यायला हवे हे आधी तुम्हाला कळायलाच हवे”. तसेच आणखी एक नेटकरी म्हणाला, “सर कृपया धार्मिक सल्ले देऊन आपली आमच्या मनातील चांगली नटाची प्रतिमा मलिन करू नका.”. तर दुसरा नेटकरी यावर म्हणाला, “फटाके फोडून लगेच हवेचा दर्जा पूर्ण ढासळणार. बाकी इतकी वाहन, इंडस्ट्री यांच्यापासून रोज हवा शुद्ध होत असते. युद्धाबाबत तर न बोललेलेच बरे. हे बॉलिवूड वाल्यांचा फॅड आता इकडे पण आलं.”
हे देखील वाचा – “काशिनाथ घाणेकरांची वाईट नाटकं…”, प्रशांत दामलेंचा फोटो शेअर करत किरण मानेंची पोस्ट, म्हणाले, “भंगार चित्रपटही…”
तर, “मांगले साहेब आपले हे विचार क्रिकेट वर्ल्डकपची मॅच संपल्यानंतर जे फटाके फोडतात त्यांना ही सांगा, उगीच दिवाळी आली म्हणून सामान्य माणसाला उपदेशाचे डोस पाजू नका.”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी वैभव यांच्या या मतावर सहमती दर्शवली आहे. एका नेटकऱ्याने याचे समर्थन करत म्हटले, “या गोष्टी वेळीच मनावर घेतल्या तर बरं होईल, अन्यथा रोगराईला सरळ आमंत्रण राहील.”. एकूणच वैभव यांच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा होताना दिसते.