रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मराठी मुलगा बिझनेस करतोय याचं…”, सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले, “आई-बापाच्या जीवावर…”

Majja Webdeskby Majja Webdesk
नोव्हेंबर 7, 2023 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Miling gawali post about supriya pathare son hotel

Miling gawali post about supriya pathare son hotel

मराठमोळी अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आजवर आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सुप्रिया नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. सध्या त्या त्यांच्या ‘महाराज’ हॉटेलमुळे बऱ्याच चर्चेत आहेत. त्यांच्या लेकाने नुकतंच हे हॉटेल सुरु केलं आहे. हॉटेल सुरु झाल्यापासून बऱ्याच कलाकार मंडळींनीही हजेरी लावली आहे. पदार्थांचा आस्वाद घेत त्यांनी पोस्टही शेअर केल्या आहेत. नुकतेच ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेते मिलिंद गवळी यांनी देखील हॉटेलला हजेरी लावली. याचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी भलीमोठी पोस्ट लिहीत त्यांनी हॉटेलमधील उत्कृष्ट पदार्थांचं आणि मिहीरचं कौतुक केलं आहे. (Miling gawali post about supriya pathare son hotel)

मिलिंद यांनी ‘महाराज’ हॉटेलला भेट देत तेथील स्पेशल पदार्थांवर ताव मारला. त्यावेळीचा अनुभव शेअर करत त्यांनी सुप्रियाबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी मिलिंद यांनी भलं मोठं कॅप्शन दिलं आहे. मिलिंद लिहीतात, “’महाराज हॉटेल’ सुप्रिया पाठारे यांचा चिरंजीव मिहीरने ठाण्यामध्ये सुरू केलं आहे.
‘स्टार प्रवाह’च्या ‘दिवाळी सोहळ्या’मध्ये माझी व सुप्रियाची भेट झाली. तेव्हा मला तिच्याकडून कळलं की मिहीरने हॉटेल सुरू केलं आहे. मी मिहीरला अगदी लहानपणापासून ओळखतो. मिहीरला शेफ व्हायचं होतं हे त्यांनी फार पूर्वीच आपल्या आई-वडिलांना सांगितलं होतं. मधल्या काळामध्ये त्याने एक फूड ट्रकही सुरू केला होता. त्यानंतर आता त्याने ‘महाराज’ नावाचं हे हॉटेल सुरु केलं आहे. मुलांना यशस्वी होण्यासाठी जिद्द, आवड या गोष्टी आवश्यक असतात. मिहीरमध्ये शेफ बनण्याची आवड होती. ज्यावेळी मी त्याच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो त्यावेळी त्यांची ती आवड मला परवा प्रत्यक्षात पाहायला मिळाली”.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

आणखी वाचा – दहा वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडबरोबर विवाहबंधनात अडकणार रणदीप हुड्डा, कोण आहे अभिनेत्याची होणारी बायको?

मिलिंद पुढे लिहीतात, “तो स्वतः पावभाजी बनवत होता. ती बनवताना तो त्यात पूर्णपणे रमला होता. अगदी मन लावून तो पावभाजी बनवत होता. मला व दीपाला पाहिल्यानंतर मिलिंद म्हणाला, ‘मामा तुम्ही बसा मी तुम्हाला स्पेशल हरियाली पावभाजी खायला घालतो’, त्याने त्यानंतर आम्हाला अतिशय चविष्ट दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पावभाज्या आणि मस्त तवा पुलाव खाऊ घातला. त्यानंतर थोड्या वेळाने सुप्रिया हॉटेलमध्ये आली. आम्ही गप्पा मारत बसलो पण आमचं पूर्णपणे लक्ष मिहीर कडे होतं. तो अगदी एकाग्रतेने त्याचं काम करत होता. कोहली, तेंडुलकर जसं मन लावून त्यांचा खेळ खेळत असतात, तसाच मिहीर त्याचा आवडीचा खेळ खेळत होता. चविष्ट, चवदार पदार्थ बनवून लोकांना खाऊ घालत होता. खरंच मला मिहीर सारख्या मुलांचा खूप अभिमान वाटतो. तो त्याची आवड जोपासतो आहे. खूप कष्ट करत आहे. आई-वडिलांना अभिमान वाटेल असं काहीतरी करत आहे”.

आणखी वाचा – Video : नाकात नथ, कपाळी टिकली अन्…; आमिर खानच्या लेकीचं महाराष्ट्रीयन पद्धतीने केळवण, होणाऱ्या नवऱ्यासाठी घेतला उखाणा

मिलिंद पुढे लिहीतात, “आपण जेव्हा आजूबाजूला त्याच्याच पिढीची, वयाची मुलं आई-बापाच्या जीवावर नुसतं मजा करताना दिसतात. स्वतःची काम सोडून अभ्यास सोडून वर्ल्डकपच्या मॅचेसमध्ये रमलेले दिसतात. त्यात महत्त्वाचं म्हणजे एक मराठी मुलगा बिझनेस करतो. धंद्यामध्ये उतरतो, हीच यशाची पहिली पायरी आहे. खरंच मी मनापासून सदिच्छा व्यक्त करतो आणि भारतभर ‘महाराज’ हॉटेलच्या शाखा उघडू देत. मिहीरला व त्याच्या या नवीन व्यवसायाला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. यशस्वी भव! तुम्ही ठाण्यात असाल, डॉक्टर काशिनाथ घाणेकर सभागृहाच्या परिसरात असाल आणि पावभाजी खायची इच्छा झाली तर नक्की मिहीरच्या हॉटेल ‘महाराज’ला भेट द्या”, असं लिहीत मिलिंद यांनी सुप्रिया यांच्या लेकाचं कौतुक केलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही बरेच कमेंट केले आहेत. एक नेटकऱ्याने, ‘आम्ही महाराजला भेट देऊन गेलो. कमाल खडा पावभाजी व मलाई सोया चीप’, असं लिहीत ‘महाराज’ हॉटेलमधील पदार्थांचं कौतुक केलं आहे. तर दुसऱ्या नेटकऱ्याने, ‘पावभाजी फेवरेट आहे त्यामुळे आम्ही नक्की जाणार’, अशी कमेंट केली आहे.

Tags: aai kute kay kartefame actormihir hotelmilind gawalisupriya pathare
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Pardeep Kharera On Elvish Yadav

सापांची तस्करी प्रकरणात एल्विश यादव पाठोपाठ मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीचं नाव समोर, स्पष्टीकरण देत म्हणाला, "आम्ही सापांची…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.