सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं नाव कलाक्षेत्रात अगदी आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर मालिका, चित्रपटांमध्ये केलेलं काम उल्लेखनीय आहे. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्या अगदी उत्साहाने आणि मेहनतीने काम करतात. ‘बिग बॉस’ सारख्या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कलाकार खूप विचार करतात. मात्र उषा यांनी या शोचं चॅलेंज स्वीकारलं. फक्त स्वीकारलं नव्हे तर बरेच आठवडे त्या या शोमध्ये खेळल्या. हिंमतीने, जिद्दीने टिकून राहिल्या. कामाप्रती उषा यांचं असणारं प्रेम खरचं कौतुकास्पद आहेच. त्यांनी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण यामध्ये वैयक्तिक नुकसान झाल्याचं उषा यांचं मत आहे. (usha nadkarni bigg boss marathi)
‘बिग बॉस मराठी’ नंतर उषा जेव्हा घरी परतल्या तेव्हा त्या सगळं विसरल्या होत्या. त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं. इतकंच काय तर उषा स्वतःचं घरंही विसरल्या होत्या. ७७ दिवस त्या ‘बिग बॉस’मध्ये होत्या. पण या शोनंतर उषा यांच्या डोक्यावर काहीसा परिणाम झाला होता हे समोर आलं आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत उषा यांनी याबाबत सांगितलं.
उषा म्हणाल्या, “मी या शोनंतर जेव्हा घरी आली तेव्हा माझ्या भावाने दरवाजा उघडला. मी त्याला लगेचच विचारलं की, हॉल इतका छोटा का वाटत आहे?. भाऊ मला लगेचच म्हणाला की, हा छोटा हॉल आहे?. या शोमध्ये राहून मी खूप गोष्टी विसरले होते. मला माझा फोन नंबरही आठवत नव्हता. मी सगळं विसरले होते. फोन कसा लावायचा? याचाही मला विसर पडला होता. कारण त्यादरम्यान जगाशी तुमचा काहीच संपर्क नसतो”.
आणखी वाचा – “सासूबाईंमुळे एकत्र राहतो नाहीतर…”, गोविंदाच्या बायकोचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “कोणाची नजर लागली आणि…”
उषा आता ७९ वर्षांच्या आहेत. मात्र तरीही ‘बिग बॉस’ सारख्या शोचं त्यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये सोनं केलं. याचविषयी त्या म्हणाल्या, “तिथे सगळे पागलसारखेच होतात. मला तर खूप खराब अनुभव आहे. पुन्हा बोलवणार असतील तर मी जाणारच नाही. फक्त नमस्कार करुन पुन्हा येईन. ७७ दिवस मी पागल झाले होते. माझ्या डोक्याला किड लागली होती. बाकीच्या स्पर्धकांची काय अवस्था होते? हे मलातरी माहित नाही”. उषा यांनी ७७ दिवस ‘बिग बॉस मराठी’मध्ये धमाल केली. दरम्यान त्यांच्या जिद्दीचं, मेहनतीचं यावेळी विशेष कौतुकही झालं.