शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 15, 2025 | 3:33 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tinnu Anand On Trolling

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, "कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…"

Tinnu Anand On Trolling : सुप्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते टिनू आनंद सध्या भटक्या कुत्र्यांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भटक्या कुत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याने त्यांना बर्‍याच ट्रोलिंगचा सामना करावा लागला. भटक्या कुत्र्यांबाबतची पोस्ट शेअर करत टिनू यांनी हॉकीने भटक्या कुत्र्यांना मारहाण करण्याविषयी लिहिले. यावर अनेकांनी भाष्य करत टिनू यांना धारेवर धरले. मात्र आता या ट्रोलिंगवर अभिनेत्याने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अभिनेत्याने सांगितले की, भटक्या कुत्र्यांमुळे त्याने ९० हजार रुपये गमावले आहेत आणि त्याच्या लेकीच्या जीवावरही हे बेतलं असतं. या सगळ्या प्रकरणामुळे टिनू आनंद चर्चेत आले आहेत.

फ्री प्रेस जर्नलशी झालेल्या संभाषणात टिनू आनंद म्हणाले की, “माझ्या मुलीचे हाताचा मनगट तुटले आहे आणि एका महिन्यापासून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिच्या या उपचारासाठी आतापर्यंत ९० हजार रुपये खर्च आला”. टिनू यांनी सांगितले की, तीन भटक्या कुत्र्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला केला आणि त्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यात त्यांची लेक मध्ये पडली तेव्हा तिचे मनगट तुटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर टिनू यांना बरंच ट्रोल करण्यात आलं. आता या ट्रोलर्सला टिनू यांनी प्रतिउत्तर देत त्यांची बोलती बंद केली आहे.

आणखी वाचा – ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली, आता या दिवशी चित्रपटगृहात दाखल होणार, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

टिनू म्हणाले, “मला त्या कुत्रा प्रेमींशी बोलावे लागेल. जर ते त्या कुत्र्यांवर इतके प्रेम करतात, त्यांना खायला घालतात, त्यांची काळजी घेतात तर मग ते त्यांना स्वतःवर ताबा ठेवायला नाही शिकवत का?. मी ८० वर्षांचा आहे, जर कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर मला स्वत: ला वाचवण्याचा पूर्णपणे हक्क आहे. याचाच अर्थ असा आहे की हे लोकांना समजले पाहिजे. मी कुत्र्यांवर हल्ला करायला नाहीतर स्वतःला वाचवण्यासाठी हे बोललो. हा माझा हक्क आहे”.

आणखी वाचा – तीन वर्षांची असताना अ‍ॅसिड हल्ला, दृष्टी गेली अन् ‘ति’ने १२वीमध्ये मिळवले ९५ टक्के

“एका शूटनंतर परत येताना, मला भयानक कुत्रे भुंकताना दिसले आणि मला माहित नव्हतं की, ते पुढे कोणाला चावतील. आव्हान स्वीकारले. त्यांच्यांशी सामना करण्यासाठी माझ्याकडे हॉकी स्टिक आहे. मी सर्व श्वानप्रेमींना इशारा देत आहे. त्यांना घरी घेऊन जा नाहीतर माझ्या क्रोधाला सामोरे जा. माझ्या सोसायटीला आधीच माहिती देण्यात आली आहे”, अशी पोस्ट यापूर्वी टिनू आनंद यांनी केली होती.

Tags: bollywood actorstreet dog beatTinnu Anand On Trolling
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
kalki koechlin water birth

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्...; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.