शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“डोक्याला कीड लागली, पागल झाले, वाईट अनुभव अन्…”, ‘बिग बॉस मराठी’बाबत बोलल्या उषा नाडकर्णी, ७७ दिवसांनंतर…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 15, 2025 | 1:32 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
usha nadkarni bigg boss marathi

“डोक्याला कीड लागली, पागल झाले, वाईट अनुभव अन्...”, ‘बिग बॉस मराठी’बाबत बोलल्या उषा नाडकर्णी

सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचं नाव कलाक्षेत्रात अगदी आदराने घेतलं जातं. त्यांनी आजवर मालिका, चित्रपटांमध्ये केलेलं काम उल्लेखनीय आहे. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्या अगदी उत्साहाने आणि मेहनतीने काम करतात. ‘बिग बॉस’ सारख्या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कलाकार खूप विचार करतात. मात्र उषा यांनी या शोचं चॅलेंज स्वीकारलं. फक्त स्वीकारलं नव्हे तर बरेच आठवडे त्या या शोमध्ये खेळल्या. हिंमतीने, जिद्दीने टिकून राहिल्या. कामाप्रती उषा यांचं असणारं प्रेम खरचं कौतुकास्पद आहेच. त्यांनी ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभाग घेत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पण यामध्ये वैयक्तिक नुकसान झाल्याचं उषा यांचं मत आहे. (usha nadkarni bigg boss marathi)

‘बिग बॉस मराठी’ नंतर उषा जेव्हा घरी परतल्या तेव्हा त्या सगळं विसरल्या होत्या. त्यांना काय करावं काहीच कळत नव्हतं. इतकंच काय तर उषा स्वतःचं घरंही विसरल्या होत्या. ७७ दिवस त्या ‘बिग बॉस’मध्ये होत्या. पण या शोनंतर उषा यांच्या डोक्यावर काहीसा परिणाम झाला होता हे समोर आलं आहे. ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत उषा यांनी याबाबत सांगितलं.

आणखी वाचा – “आडनावावरुन काम, टॅलेंट न बघताच…”, मिथुन चक्रवर्तींच्या लेकाचे बॉलिवूडवर गंभीर आरोप, म्हणाला, “वडिलांना बी-ग्रेड म्हणत…”

View this post on Instagram

A post shared by Usha Nadkarni???? (@usha__nadkarni)

उषा म्हणाल्या, “मी या शोनंतर जेव्हा घरी आली तेव्हा माझ्या भावाने दरवाजा उघडला. मी त्याला लगेचच विचारलं की, हॉल इतका छोटा का वाटत आहे?. भाऊ मला लगेचच म्हणाला की, हा छोटा हॉल आहे?. या शोमध्ये राहून मी खूप गोष्टी विसरले होते. मला माझा फोन नंबरही आठवत नव्हता. मी सगळं विसरले होते. फोन कसा लावायचा? याचाही मला विसर पडला होता. कारण त्यादरम्यान जगाशी तुमचा काहीच संपर्क नसतो”.

आणखी वाचा – “सासूबाईंमुळे एकत्र राहतो नाहीतर…”, गोविंदाच्या बायकोचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “कोणाची नजर लागली आणि…”

उषा आता ७९ वर्षांच्या आहेत. मात्र तरीही ‘बिग बॉस’ सारख्या शोचं त्यांनी त्यांच्या स्टाइलमध्ये सोनं केलं. याचविषयी त्या म्हणाल्या, “तिथे सगळे पागलसारखेच होतात. मला तर खूप खराब अनुभव आहे. पुन्हा बोलवणार असतील तर मी जाणारच नाही. फक्त नमस्कार करुन पुन्हा येईन. ७७ दिवस मी पागल झाले होते. माझ्या डोक्याला किड लागली होती. बाकीच्या स्पर्धकांची काय अवस्था होते? हे मलातरी माहित नाही”. उषा यांनी ७७ दिवस ‘बिग बॉस मराठी’मध्ये धमाल केली. दरम्यान त्यांच्या जिद्दीचं, मेहनतीचं यावेळी विशेष कौतुकही झालं.

Tags: bollywood newsentertainment newsUsha Nadkarni
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Garbage Collector Passed 10th Exam

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी 'ती' झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.