रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 15, 2025 | 2:00 pm
in Women
Reading Time: 1 min read
google-news
Garbage Collector Passed 10th Exam

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी 'ती' झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

Garbage Collector Passed 10th Exam : पूर्वीपेक्षा शिक्षणाला आता अधिक महत्त्व आहे. सुरुवातीला बेताच्या परिस्थितीमुळे शिक्षण घेणं अनेकांना साध्य होत नव्हते. मात्र, आता सरकारच्या अनेक सुख सुविधांमुळेशिक्षण घेणं प्रत्येकाला शक्य झालं आहे. शिक्षणाला वयाचं, परिस्थीतीचं कशाचंच बंधन नसतं असं अनेकदा बोललं जातं. हे वाक्य सत्यात उतरवलंय पुण्यातील कात्रज परिसरातील स्वच्छता कर्माचारी असणाऱ्या प्रियांका कांबळे यांनी. घराघरातून कचरा उचलण्याचं कष्टाचं काम, मुलाची जबाबदारी, वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतार या साऱ्यांशी दोन हात करत त्या दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यासाठी वय नाही तर जिद्द आणि इच्छाशक्तिची गरज असते हे या सफाई कर्मचारी असलेल्या ताईंनी सिद्ध करुन दाखवलं आहे.

दहावीच्या परीक्षेत ४७.६० टक्के गुण मिळवून त्या उत्तीर्ण झाल्या असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल सेवासदन येथे त्यांनी शिक्षण घेतलं. नवऱ्यात आणि त्यांच्यात होणाऱ्या सततच्या मतभेदामुळे त्यांनी सासर सोडलं आणि त्या आईकडे लेकासह राहायला आल्या आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. स्वतःसाठी काहीतरी करायला हवे ही खंत त्यांना शांत बसू देत नव्हती तेव्हा त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. या त्यांच्या निर्णयाला त्यांच्या आईने पूर्णपणे पाठिंबा दिला. तिचा दहावीचा निकाल ऐकून साऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पाहायला मिळाला.

आणखी वाचा – तीन वर्षांची असताना अ‍ॅसिड हल्ला, दृष्टी गेली अन् ‘ति’ने १२वीमध्ये मिळवले ९५ टक्के

हा अनुभव शेअर करत प्रियांका कांबळी म्हणाल्या की, “लहान असताना मी शिक्षण सोडून दिलं होतं. तेव्हा शिक्षणाचं महत्त्व काय आहे हे कळलं नव्हतं. मात्र, जसजसे मोठं होत गेले तेव्हा शिक्षणाचं महत्त्व कळालं. असं म्हणतात शिक्षणाला कोणतंही वय नसतं आणि हीच बाब लक्षात घेत मी शिक्षण पूर्ण करण्याचा विचार केला आणि श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्री हायस्कूल येथे आठवीपासून शिक्षण घ्यायला सुरुवात केली. मी महापालिकेत कात्रज परिसरात स्वच्छतेचं काम करते. हे काम करुन मी शिक्षण पूर्ण केलं आहे”.

आणखी वाचा – “सासूबाईंमुळे एकत्र राहतो नाहीतर…”, गोविंदाच्या बायकोचं मोठं वक्तव्य, म्हणाली, “कोणाची नजर लागली आणि…”

“सकाळी परिसरातील नागरिकांच्या घरी जाऊन कचरा गोळा करुन, मुलाला शाळेत सोडून मी माझ्या शाळेत जात होते. दहावीच्या परीक्षेला देखील मी कामावर जाऊन परीक्षेला जात होते. या काळात मला माझ्या आईने मदत केली. पास झाल्यानं मला खूपच आनंद होत आहे”, असं यावेळी प्रियांका कांबळे हिनं सांगितलं. प्रियंका यांच्या या यशाने इतर महिलांसमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःला सक्षम बनवण्याचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रोत्साहन आहे.

Tags: 10th exam resultgarbage collectormotivational news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Tinnu Anand On Trolling

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, "कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.