मनोरंजन विश्वात चित्रपट, नाटक, मालिका या माध्यमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात. काही चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करतात तर काही मालिका प्रेक्षकांच्या दररोजच्या जीवनाचा एक भाग बनतात. वेगवेगळ्या वाहिन्या वेगवेगळे विषय हाताळत दररोज काहीतरी नवीन घेऊन येतात.(jaydeep gauri romantic scene)
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. या मालिकेतील गौरी आणि जयदीपच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरक्षा डोक्यावर उचलून धरलं. बराच काळ वेगळे झालेले गौरी जयदीप अखेर आता मालिकेत एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. गौरी आणि जयदीपच्या एकत्र येण्याने प्रेक्षकही खुश असलेले पाहायला मिळत होते. मात्र यावर विरजण घालत या मालिकेला मिळत असलेली पसंती कुठेतरी कमी होताना दिसतेय आणि याचे कारणही तसेच आहे. स्टार प्रवाह वाहिनीच्या ऑफिशिअल पेजवरून ‘सुख म्हणजे नक्की काय’ असतं मालिकेतील गौरी आणि जयदीपचा एक रोमँटिक व्हिडीओ शेअर करण्यात आला. मात्र हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक संतापलेले पाहायला मिळत आहेत.
गौरी जयदीपच्या या ऑनस्क्रीन रोमान्सला प्रेक्षकांनी नाराजी दर्शविली आहे. गौरी व जयदीपचा ऑनस्क्रीन रोमान्स प्रेक्षकांच्या पसंतीस न उतरल्याचं दिसत आहे. त्यांनी या व्हिडिओवर कमेंट करत ‘सुख म्हणजे नक्की काय’ असतं मालिकेवर आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय. गौरी जयदीपचा हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांचा चांगलाच राग अनावर झालेला पाहायला मिळतोय. या व्हिडिओवर कमेंट करत त्यांनी थेट त्यांचा राग व्यक्त केलाय.(jaydeep gauri romantic scene)
====
हे देखील वाचा- ‘लग्नाला यायला जमलं नाही म्हणून भोजाने थेट..’ ओंकार भोजनेचं वनिताला खास सरप्राईझ
====
एका युजरने कमेंट करत असे म्हटले आहे की, “फॅमिली सोबत बघता येईल असेच व्हिडीओ दाखवत जा. जरा बघण्यासारखं. थोडी हिंट दिली तरी सगळ्यांना समजत पुढे काय होणार आहे. सो असे रोमँटिक व्हिडीओ दाखवत जाऊ नका”. तर दुसऱ्या युजरने असे म्हटले आहे की, “आम्ही फॅमिली सोबत सिरीयल बघत असतो प्लिज हे असे सीन नका टाकत जाऊ. लहान आर्टिस्ट सिरीयलमध्ये असल्यामुळे आमची छोटी मुलंही सिरीयल बघतात”. तर एका युजरने म्हटलं आहे की “मराठी मालिकेत फालतूपणा का दाखवत आहेत”.
