सध्याच्या परिस्थतीत जर महाराष्ट्र्राला विनोद म्हणजे काय असा प्रश्न कोणी विचारला तर पहिलं नाव आपसूकच महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच येत. या कार्यक्रमानेच नाही तर त्यातील सर्व कलाकारांनीही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या कलाकारांपैकी दोन महत्वाचे कलाकार म्हणजे अभिनेत्री वनिता खरात आणि अभिनेता ओंकार भोजने. अभिनेता ओंकार भोजने जरी हास्यजत्रेचा भाग नसला तरी त्याची कलाकारांशी आणि प्रेक्षकांशी असलेली मैत्रीची नाळ अजूनही तशीच आहे.(onkar bhojne vanita kharat)
नववर्षाच्या सुरुवातीलाच वनिता आणि सुमितच्या लग्नाचा सोहळा पार पाडला. अनेक कलाकारांनी वनिताच्या लग्नाला हजेरी लावली मात्र ओंकार भोजने वनिताच्या लग्न सोहळ्यात न दिसल्यामुळे प्रेक्षकांनी ‘तुम्ही ओंकार ला बोलवलं का नाही?, ओंकार तू वनिताच्या लग्नाला हवा होतास’ असा सूर लावला. पण अखेर ओंकार भोजने ने आता आपल्या लाडक्या मैत्रिणीची घरी जाऊन भेट घेतली आहे. वनिता आणि ओंकारच्या भेटीचा व्हिडिओ वनिताने तिच्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओ मध्ये ओंकार दरवाजाची बेल वाजवतो वनिता दरवाजा उघडते आणि ओंकारला पाहून थक्क होते. तर एक मजेशीर किस्सा या व्हिडिओत पाहायला मिळतोय.
ओंकार घरात आल्यानंतर वने म्हणत वनिताला मिठी मारतो तर तेव्हाच सुमित ओंकारला मारत ‘ते सगळं स्किट मध्ये आता ती माझी खरी बायको आहे असं म्हणतो’ त्यावर हो म्हणत चल वने नाही वहिनी चला असं ओंकार म्हणतो आणि एकच हशा पिकतो. तर वनिताच्या या व्हिडिओ वर अन्य कलाकारांनीही हसून दाद दिली आहे.(onkar bhojne vanita kharat)
====
हे देखील वाचा – अभिनेते शंतनू मोघे पुन्हा एकदा साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
====
भेटीअंती वनिता आणि सुमित साठी ओंकार भेटवस्तू देखील घेऊन आलेला दिसतो. तर वनिताने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये ‘लग्नाला येता आलं नाही म्हणून भोजाने डायरेक्ट घरी येऊन सरप्राईज दिलं’ असं लिहिलं आहे. वने आणि भोजन्या अशी एकमेकांना हाक मारत या मित्रांची भेट प्रेक्षकांच्या मनाला सुखावते.
काही दिवसांपूर्वीच ओंकार प्रमाणेच अभिनेता प्रसाद ओक, सई ताम्हणकर यांनी देखील लग्नाला येऊ न शकल्यामुळे वणिताची माफी मागितली आणि भेटवस्तू सुद्धा दिल्या.