बॉलीवूडमधील स्टायलिश अभिनेत्री उर्वशी रौतेला कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. सनी देओलबरोबर ‘सिंह साहेब द ग्रेट’ चित्रपटातून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणारी उर्वशी कधी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. अशातच काही दिवसांपूर्वी तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामुळे तिला ट्रोल केलं गेलं. अभिनेत्रीचा बाथरूममधील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काहींनी पब्लिसिटी स्टंट केल्याचंही म्हटलं होतं. अशातच या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी उर्वशीने स्वत:हून भाष्य केलं आहे. (Urvashi Rautela on bathroom video leak case)
अभिनेत्री उर्वशी रौतेलाने ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत त्या लीक झालेल्या व्हिडिओबद्दल उघडपणे सांगितलं. उर्वशीने दावा केला की, निर्मात्यांनी आधीच तिच्याकडून परवानगी घेतल्यामुळे हा व्हिडिओ जाणूनबुजून लीक करण्यात आला होता. वादग्रस्त प्रमोशनल स्टंटमागचे कारण सांगताना उर्वशीने सांगितले की, “निर्माते रडत माझ्याकडे आले. ती म्हणाले, आमच्या सिनेमाचं कोणतंच प्रमोशन झालं नाही. काही कारणांमुळे त्याला त्याची जमीन विकावी लागली. म्हणून आम्हाला चित्रपटासाठी एक चर्चा निर्माण करावी लागली. निर्माते कर्जात बुडाले होते. तो काही कर्जात अडकला होता. म्हणून त्याला त्याची जमीन द्यावी लागली. तो रस्त्यावर येणार होता”.
आणखी वाचा – सासूबाईंबरोबर डेटवर निघाली शिवानी रांगोळे, दोघींच्याही मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, फोटो तुफान व्हायरल
अभिनेत्री पुढे म्हणाली, “तो आला आणि माझ्या बिझनेस मॅनेजरशी चर्चा केली. आणि मग माझी परवानगी घेतली. हा चित्रपटातील माझा एक चांगला सीन आहे. त्यामुळे त्या निर्मात्यांची विनंती होती की आपण आधी तो सीन व्हायरल करु शकतो का? आणि ही एक प्रकारची जागरूकता होती की, मुलींना सावध राहावे लागेल. याचा उद्देश विशेषत: मुलींमध्ये सावध राहण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हादेखील होता”.
आणखी वाचा – Video : रुग्णालयातून घरी परतताना पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आला सैफ अली खान, दिसला डॅशिंग अंदाज, व्हिडीओ समोर
दरम्यान, सुसी गणेशन लिखित आणि दिग्दर्शित ‘घुसपथिया’ हा क्राइम ड्रामा चित्रपट ९ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यात उर्वशी रौतेलासह विनीत कुमार सिंग, गोविंद नामदेव आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत.