बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जखमी होऊन सहा दिवसांनी डॉक्टरांनी त्याला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. सैफ हॉस्पिटलमधून त्याच्या फॉर्च्युन हाइट्स येथील जुन्या घरात शिफ्ट झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या घराबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मीडिया आणि पापाराझींची प्रचंड गर्दी पाहून पोलिसांनी त्याच्या घराभोवती बॅरिकेड्स लावले आहेत. सैफ अली खानला गुरुवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वास्तविक, मध्यरात्री सैफ अली खानवर त्याच्या घरी हल्ला झाला होता. यानंतर तो मुलगा तैमूरबरोबर हॉस्पिटलमध्ये पोहोचला. सैफवर सहा हल्ले करण्यात आले. त्याच्या पाठीच्या कण्याजवळ चाकूचा तुकडा अडकून राहिला होता. यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करावी लागली. (saif ali khan discharged)
अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यापूर्वी करीना कपूर, सारा अली खान, शर्मिला टागोरही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या होत्या.यानंतर आता तो घरी परतला आहे, पंधरा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा गॉगल या लूकमध्ये अभिनेता त्याच्या घरी सुखरूप पोहोचला आहे. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अभिनेता घरी पोहोचला आहे. तसंच त्याच्या घराबाहेर सुरक्षाही अधिक वाढवण्यात आलेली आहे. सैफ अली खानच्या घरी जातानाचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडीओवर अनेकांनी त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा – सासूबाईंबरोबर डेटवर निघाली शिवानी रांगोळे, दोघींच्याही मॉर्डन लूकने वेधलं लक्ष, फोटो तुफान व्हायरल
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी सध्या त्याला विश्रांतीची नितांत गरज आहे. डॉक्टरांनी सांगितले की सैफला चालणे आणि बोलणे शक्य असले तरी त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी कमीतकमी ३० दिवस म्हणजे एक महिना लागेल. वास्तविक, त्याच्या पाठीतून चाकूचा २.५ इंच तुकडा काढण्यात आला. त्या भागावर कॉस्मेटिक शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, जी बरी होण्यासाठी एक महिना लागेल.
दरम्यान, सैफ अली त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या घरात शिफ्ट झाल्याची चर्चा आहे. आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, तैमूर आणि जेहची खेळणी आणि सामान रात्री सद्गुरु शरण अपार्टमेंटमधून फॉर्च्यून हाइट्समध्ये नेण्यात आले. मात्र, सैफ अली खान, करीना किंवा त्यांच्या कुटुंबीयांकडून या बातमीला दुजोरा देण्यात आलेला नाही. सैफ अलीचे आलिशान अपार्टमेंट टर्नर रोड, फॉर्च्यून हाइट्स, मुंबई येथे आहे.