Saif Ali Khan House : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान त्याच्यावरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी परतत आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खान आज घरी परतणार आहे. मात्र, ज्या घरात त्याच्यावर हल्ला झाला होता म्हणजे वांद्रे येथील सतगुरु शरण येथे अभिनेता जाणार नाही. याऐवजी अभिनेता मुंबईतील त्याच्या दुसऱ्या अपार्टमेंट फॉर्च्युन हाईट्समध्ये राहणार असल्याचं बोललं जात आहे. वांद्रे येथील फॉर्च्युन हाईट्समध्ये सैफ अली खान व त्याचं कुटुंब आधीपासून राहत होते. मात्र, सतगुरु शरण येथे त्यांनी नवं घर घेताच तिथे ते शिफ्ट झाले. आणि जुन्या घराचे सैफ अली खानने ऑफिसमध्ये रुपांतर केले.
सैफ व करिनाचे हे आलिशान घर मुंबईतील वांद्रे येथील फॉर्च्युन हाइट्समध्ये आहे. हे 3BHK लक्झरी अपार्टमेंट आहे. जेव्हा करीना कपूर दुसऱ्यांदा गरोदर राहिली त्यानंतर या जोडप्याने हे घर तयार करुन घेतले. सैफ-करिनाचे हे घर डिझायनर दर्शिनी शाह यांनी डिझाइन केले आहे. करीना कपूरच्या या घरात मुलांच्या खेळण्याच्या खोलीपासून ते स्विमिंग पूलपर्यंत सर्व सुविधांची काळजी घेण्यात आली आहे. सैफ-करिनाच्या घराची लिव्हिंग रुम खूप खास आहे. यामध्ये तुम्हाला एका कोपऱ्यात एक लायब्ररीही बांधलेली दिसतेय.
आणखी वाचा – सहा दिवसांनी घरी परतणार सैफ अली खान, रुग्णालयातून घरी जायला निघाला अभिनेता, आता परिस्थिती कशी?

सैफला पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे. अभिनेत्रीच्या घराच्या इंटिरिअरला विंटेज लूक देण्यात आला आहे. घराभोवती बाल्कनी बांधण्यात आल्या आहेत. जिथे तुम्हाला काचेच्या भिंती दिसतील. अनेक झाडांशिवाय सैफने आपल्या घराची बाल्कनी पेंटिंग्जने सजवली आहे. सैफ व बेबोची बेडरुमही खूप आलिशान आहे. येथे कौटुंबिक चित्रे भिंतींवर टांगण्यात आली आहेत. सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर त्याला पाच दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सैफचे अपार्टमेंट सतगुरु शरण बिल्डिंगमध्ये आहे, येथेच अभिनेत्यावर हल्ला झाला होता. या घटनेनंतर सैफ अली खानच्या घराची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. त्याच्या घरात अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. सध्या वायरिंगचे काम सुरु आहे. डक्ट बंद करण्याचेही काम सुरु आहे. सैफ अली खानचे ऑपरेशन आणि उपचार करणाऱ्या चार डॉक्टरांच्या टीमने सैफ चालण्यास सक्षम असल्याचे सांगितले आहे. तो बोलण्यास सक्षम आहे परंतु त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी एक महिना लागेल, असंही सांगण्यात आलं आहे.