मराठी मनोरंजन सृष्टीत नवरा-बायको प्रमाणेच काही सासू-सूनांची जोड्याही लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांची जोडी. मृणाल कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांच्यात सासू-सुनेचे नाते आहेच. पण या सासू-सुनेच्या नात्यापेक्षा त्या एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी आहेत. दोघींमध्ये खूप छान बाँडिंग आहे. याबद्दल दोघींनी अनेकदा अनेक मुलाखतींमधून भाष्यदेखील केलं आहे. शिवानी मृणाल कुलकर्णी यांची खूप लाडकी आहे. दोघी सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात आणि एकमेकींबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ त्या शेअर करत असतात. अशातच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (shivani rangole and mrinal kulkarni photo)
शिवानी रांगोळे ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिच्यासह सासू मृणाल यांच्याबरोबरचे अनेक फोटो शेअर करत असते. त्यांच्या या फोटोला चाहत्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असतो. अशातच शिवानी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये एक फोटो स्वत: शिवानीचा आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये तिच्यासह मृणाल कुलकर्णीही आहेत. या फोटोवरील कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. “Date with Sasubai” असं म्हणत शिवानीने हा खास फोटो शेअर केला आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानी व विराजस अनेक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत होते आणि त्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी एकमेकांना आयुष्याचं जोडीदार म्हणून निवडलं. विराजसची आई व प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांची शिवानी यांच्या सासू-सुन या नात्यापेक्षा त्या एकमेकांच्या खूप छान मैत्रिणी असल्याचा आणि दोघींमधील खास नात्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे.
आणखी वाचा – तितीक्षा तावडेचं लग्नानंतरचं पहिलं हळदी-कुंकू, काळ्या रंगाच्या साडीमध्ये खुललं सौंदर्य, फोटो समोर
दरम्यान, दोघींच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, मृणाल यांचा नुकताच ‘गुलाबी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित होउण गेला. तर शिवानी सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. मालिकेत सध्या ती गरोदर असल्याचे पाहायला मिळत आहे