आई कुठे काय करते मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद यांनी साकारलेलं पात्र जरी नाकातरातमक असाल तरीही प्रेक्षक त्यांच्यावर भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. मिलिंद गवळी या मालिकेत जरी नाकारातमक दिसत असेल तरी त्यांच्या समाज माध्यमांवर केल्या जाणाऱ्या अनेक पोस्ट वाचकांना सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या असतात. नेहमीप्रमाणे नुकतीच मिलिंद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम वर एक पोस्ट टाकली आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या भावंडां बद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.(MIlind Gawali Sisters)
त्यांनी कॅप्शन मध्ये खरंतर आपल्याकडे असे भावंड दिवस वगैरे साजरे करायची पद्धत नाहीये, दहा तारखेला वर्ल्ड भावंड दिवस होता हे मी आज पेपरमध्ये ज्यावेळेला सेलिब्रिटी भावंडांचे फोटो पाहिले तेव्हां माझ्या हे लक्षात आलं, खरंतर आपल्याकडे भाऊबीज किंवा रक्षाबंधन हा बहिण भावांचा फार सुंदर दिवस असतो, भावा भावांचा असा आपल्याकडे दिवस आहे की नाही मला माहिती नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी असा दिवस नसावा असं मला, नाहीतर माझा “सख्खा भाऊ पक्का वैरी” हा चित्रपट इतका चालला नसता.

बहिणींसाठी खास पोस्ट
माझ्या बहिणीने म्हणजेच संख्याने मला लहानपणापासून आईचीच माया दिली आहे, म्हणजे आई गेल्यानंतर ती माझी धाकटी बहीण असून माझ्या आयुष्यात आईची जागा भरून काढायचा सतत प्रयत्न करत असते, खरंच ज्यांना बहिणी आहे नशीब काढूनच आलेली असतात,परोपकार करत राहणे, सतत सेवा करत राहणे हे आपलं कर्तव्यच आहे असं तिला वाटतमाझ्या नंतर माझ्या आईच्या पोटी २ वर्षां नी जन्माला आलेली माझी बहिण संग्या म्हणजेच संगीता , तशीच रक्ताच्या नात्याइतकीच घट्ट असणारी माझी बहीण पिंकी (सुचित्रा) जी प्रेमाने सगळ्यात जास्ती माझ्यावर अधिकार गाजवते.(MIlind Gawali Sisters)
सूमेघा, मीनल ,प्रीतम , पिंकी(सृष्टी), विद्या, ज्योती ,मंजू ,माधुरी , शक्ती, शिल्पा, स्मिता, वर्षा ,स्वाती,वृषाली, वैशाली सोनल ,शितल, गुड्डी , शर्मिलामाझ्या मावस बहिणी मामी बहिणी चुलत बहिणीआणि या क्षेत्रामध्ये सुद्धा माझ्या असंख्य बहिणी आहेत.माझ्या या सगळ्या बहिणींना मनापासून खूप खूप शुभ आशीर्वाद. यातल्या काही जगाच्या दुसऱ्या टोकाला आहेत,ज्यांची माझी अनेक वर्ष भेटही झाली नाही आहे, तरी माझं त्यावर खूप खूप प्रेम आहे आणि तुम्हाला खूप खूप आशीर्वाद ..सुखी रहा आनंदी राहा… अशा प्रेमळ शब्दांमध्ये त्यांनी आपल्या बहिणीनं बद्दल प्रेम व्यक्त केलं आहे.
हे देखील वाचा – म्हणून अशोक सराफ नानांना म्हणाले..’काय नान्या श्रीमंत झालास का?’
