Umesh Kamat New Bike : घर, गाडी घेण्याचं आणि सुखाचं आयुष्य जगण्याचं प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. कलाकारचं नव्हे तर सर्वसामान्यही या स्वप्नांच्या मागे झटताना दिसतो. अशातच बरीच वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या एका अभिनेत्याचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. हा अभिनेता म्हणजे मराठी मालिकाविश्व, रंगभूमी, तसेच चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारा उमेश कामत. उमेशने आजवर अनेक दर्जेदार चित्रपटांमधून उमेशने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. उमेशसह त्याची बायको म्हणजेच अभिनेत्री प्रिया बापट हे दोघे मराठी कलाविश्वातील क्युट जोडी म्हणून बरेच लोकप्रिय आहेत.
प्रिया-उमेशची ही जोडी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर दोघेही अनेक रील व फोटो शेअर करतात. सोशल मीडियावर हे दोघे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अशातच उमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उमेशने त्याच स्वप्न पूर्ण होत त्याच पहिलं प्रेम पुन्हा त्याच्या आयुष्यात आलं असल्याचं म्हटलं आहे.
पोस्ट शेअर करत उमेशने नवी दुचाकी खरेदी केली असल्याचं म्हटलं आहे. “माझं पहिलं प्रेम माझ्या आयुष्यात परतलं. अर्थात बायको माझी आजची व्हिडीओग्राफर होती”, असं कॅप्शन देत त्याने नव्या गाडीबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये उमेश त्याच्या नव्या दुचाकीला आणायला शोरूममध्ये गेला असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे तर यावेळी प्रियाही त्याच्याबरोबर दिसतेय. बाईक हातात येताच प्रियाने बाईकची पूजाही केली. दुचाकीवर बसून उमेशने काढलेल्या फोटोमध्ये तो खूप खुश दिसत आहे.
आणखी वाचा – अहिल्यादेवींनी पारूकडून हिरावलं ब्रँड अँबेसेडरचं पद, अनुष्काचा विजय, आदित्य कोणाची बाजू घेणार?
उमेशचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. उमेशने आजवर अनेक मराठी नाटकं, मालिका, चित्रपट यांमध्ये काम केले आहे. तर प्रियानेही अभिनयक्षेत्रात यश मिळविले. मराठीबरोबरच तिने हिंदी भाषेतही काम केले. तिची हिंदी वेब सिरीज सिटी ऑफ ड्रिमस् खूप गाजली. अभिनेत्रीचा नुकताच तिसरा सिझन प्रदर्शित झाला आहे. मराठीमध्ये उमेश व प्रियाची ‘आणि काय हवं?’ ही वेब मालिका खूप गाजली. त्यांची भन्नाट केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते.