‘द लायन किंग’ हा चित्रपट सगळ्यांच्याच पसंतीस उतरला. हिंदी चित्रपटासाठी शाहरुख खान व त्याचा लाडका लेक अबराम व आर्यन यांनी आवाज दिला होता. त्यानंतर त्या चित्रपटाचा दूसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा चित्रपट म्हणजे ‘मुफासा : द लायन किंग’ . २० डिसेंबर २०२४ रोजी हा चित्रपट सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. अल्लू अर्जुनचा सुपरहिट चित्रपट ‘पुष्पा २’ ला या चित्रपटाने जबरदस्त टक्कर दिली होती. बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेला हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (mufasa : the lion king ott release)
‘मुफासा : द लायन किंग’ हा चित्रपट सर्व भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने १३६.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. १६ दिवसांत जगभरात ३२५० कोटी रुपये कमावले. तसेच या चित्रपटाचे ओव्हरसीज कलेक्शन २०५० कोटी रुपये आहे व भारतातील कलेक्शन १५५.२५ कोटी रुपये आहे. २०२४ मधील जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्येमध्ये ‘मुफासा…’ चा समावेश झाला आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी येणार? याची घोषणा केलेली नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार,चित्रपटगृह व डिजिटल प्रदर्शनामध्ये १०० दिवसांचे अंतर असले पाहिजे. म्हणजेच मार्च किंवा एप्रिल २०२५ मध्ये हा चित्रपट ओटीटीवर बघायला मिळू शकतो. याआधी डिस्नीचा ‘द लिटिल मरमेड’ प्रदर्शनानंतर १०३ दिवसांनी ओटीटीवर दाखवण्यात आला होता. सहसा डिस्नीचे सर्व चित्रपट हे दोन महिन्यांनंतर ओटीटीवर खरेदीसाठी तयार असतात. हा चित्रपट २० डिसेंबर २०२४ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला होता.
दरम्यान ‘मुफासा : द लायन किंग’ हा चित्रपट २०१९ साली आलेल्या ‘द लायन किंग’ चा सीक्वल आहे. या चित्रपटाच्या हिंदी चित्रपटासाठी शाहरुख खान, अबराम खान, आर्यन खान, श्रेयस तळपडे, संजय मिश्रा, आशीष विद्यार्थी यांनी भूमिकांना आवाज दिले आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. त्यामुळे आता ओटीटीवर चित्रपट कधी बघायला मिळणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.