Gurmeet Choudhary Daughters Troll : सध्याच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाचे प्रस्त अधिकच वाढले आहे. या सोशल मीडियाचे जितक्या सकारात्मक गोष्टी आहेत. तितक्याच नकारात्मक गोष्टीही आहेत आणि यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रोलिंग. कलाकारांनाही या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. कालाकारांबरोबरच त्यांच्या मुलांनाही या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा कलाकार मंडळी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही कलाकार याबद्दल आपली भूमिका ठामपणे मांडतात. असंच एका कलाकार जोडप्याने त्यांच्या मुलांबद्दलच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे आणि हे कलकार म्हणजे गुरुमीत चौधरी आणि देबिना बनर्जी. गुरुमीत चौधरी व देबिना बॅनर्जी हे २०११ मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या ११ वर्षानंतर, त्यांनी एप्रिल २०२२मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. (Gurmeet Choudhary daughters trolling)
नंतर, नोव्हेंबर २०२२ मध्ये गुरमीत व देबिना यांना दुसरे मूल झाले, ज्याचे नाव त्यांनी दिविशा ठेवले. आता, चार जणांचे कुटुंब एकत्र आयुष्याचा आनंद घेत आहे आणि दररोज त्यांच्या मुलांचे फोटो शेअर करत असतात. गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण त्यांच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करतात. या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. मात्र, काही चाहत्यांकडून या जोडप्याला त्यांच्या मुलाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात. या प्रतिक्रियांमधून त्यांची मुलं लियाना व दिविशा यांना लक्ष्य केलं जातं. ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गुरमीतने आपल्या मुलांना लक्ष्य करणाऱ्या ट्रोल्सबद्दल भाष्य केलं आहे आणि यावेळी त्यांनी त्यांच्या प्रसिद्धीचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.
यावेळी गुरमीत असं म्हणाला की, “जेव्हा आम्ही अभिनेते आणि सेलिब्रिटी असतो, तेव्हा आमचं आयुष्य फक्त आमचंचं नसतं. आमचं आयुष्य हे सार्वजनिक होतं. आम्ही सर्व लोकांसाठी आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी काम करत आहोत. या व्यवसायात प्रवेश करुन सार्वजनिक व्यक्ती बनण्याचा आमचा निर्णय होता. आम्हाला प्रसिद्ध व्हायचे होते आणि सार्वजनिक जीवन जगायचे होते. मनोरंजन हे क्षेत्र सर्वांसाठी खुले आहे. पण हे क्षेत्र खूप नकारात्मक क्षेत्र आहे”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीनंतर आता अंकिता वालावलकरवरही वर्षा उसगांवकरांचा राग, बडबडतच राहिल्या अन्…; नक्की चुकीचं कोण?