गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

निव्वळ विकृती! गुरमीत चौधरीच्या जुळ्या मुलींनाही ट्रोल करणं सोडलं नाही, अभिनेता भडकला, म्हणाला, “आम्हाला भोगावं लागतंय कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 9, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 4 mins read
google-news
TV actor Gurmeet Choudhary talked on the trolling of his two daughters know the reason

मुलांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर गुरुमीत चौधरीचं भाष्य, प्रसिद्धीचा परिणाम असल्याबद्दल मत.

Gurmeet Choudhary Daughters Troll : सध्याच्या या डिजिटल युगात सोशल मीडियाचे प्रस्त अधिकच वाढले आहे. या सोशल मीडियाचे जितक्या सकारात्मक गोष्टी आहेत. तितक्याच नकारात्मक गोष्टीही आहेत आणि यातील महत्त्वाचा प्रकार म्हणजे ट्रोलिंग. कलाकारांनाही या ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. कालाकारांबरोबरच त्यांच्या मुलांनाही या ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा कलाकार मंडळी याकडे दुर्लक्ष करतात. मात्र काही कलाकार याबद्दल आपली भूमिका ठामपणे मांडतात. असंच एका कलाकार जोडप्याने त्यांच्या मुलांबद्दलच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे आणि हे कलकार म्हणजे गुरुमीत चौधरी आणि देबिना बनर्जी. गुरुमीत चौधरी व देबिना बॅनर्जी हे २०११ मध्ये लग्नबंधनात अडकले. लग्नाच्या ११ वर्षानंतर, त्यांनी एप्रिल २०२२मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. (Gurmeet Choudhary daughters trolling)

नंतर, नोव्हेंबर २०२२ मध्ये गुरमीत व देबिना यांना दुसरे मूल झाले, ज्याचे नाव त्यांनी दिविशा ठेवले. आता, चार जणांचे कुटुंब एकत्र आयुष्याचा आनंद घेत आहे आणि दररोज त्यांच्या मुलांचे फोटो शेअर करत असतात. गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी अनेकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण त्यांच्या चाहत्यांसह सोशल मीडियावर शेअर करतात. या फोटो व व्हिडीओला चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो. मात्र, काही चाहत्यांकडून या जोडप्याला त्यांच्या मुलाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया येत असतात. या प्रतिक्रियांमधून  त्यांची मुलं लियाना व दिविशा यांना लक्ष्य केलं जातं. ‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गुरमीतने आपल्या मुलांना लक्ष्य करणाऱ्या ट्रोल्सबद्दल भाष्य केलं आहे आणि यावेळी त्यांनी त्यांच्या प्रसिद्धीचा हा परिणाम असल्याचं म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Gurmeet Choudhary (@guruchoudhary)

आणखी वाचा – Video : करिश्मा कपूरच्या लग्नात करीना कपूरने पदराने लपवलेलं तोंड, करवली म्हणून मिरवतानाचा ‘तो’ जुना व्हिडीओ समोर

यावेळी गुरमीत असं म्हणाला की, “जेव्हा आम्ही अभिनेते आणि सेलिब्रिटी असतो, तेव्हा आमचं आयुष्य फक्त आमचंचं नसतं. आमचं आयुष्य हे सार्वजनिक होतं. आम्ही सर्व लोकांसाठी आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी काम करत आहोत. या व्यवसायात प्रवेश करुन सार्वजनिक व्यक्ती बनण्याचा आमचा निर्णय होता. आम्हाला प्रसिद्ध व्हायचे होते आणि सार्वजनिक जीवन जगायचे होते. मनोरंजन हे क्षेत्र सर्वांसाठी खुले आहे. पण हे क्षेत्र खूप नकारात्मक क्षेत्र आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्कीनंतर आता अंकिता वालावलकरवरही वर्षा उसगांवकरांचा राग, बडबडतच राहिल्या अन्…; नक्की चुकीचं कोण?

यापुढे गुरमीतने असं म्हटलं की, “आम्ही कधीच विचार केला नव्हता की, आमची मुले लियाना व दिविशा यांना आमच्या प्रसिद्धीचे परिणाम भोगावे लागतील. परंतु आता ते या सर्वांना सामोरे जाण्यास शिकले आहेत. ट्रोलर्सचा एक छोटासा गट आमच्या आणि आमच्या कुटुंबाबद्दल नकारात्मक कमेंट्स करत असतात. मात्र, यातही आम्हाला सकारात्मक गोष्टी पाहायला मिळतात”.

Tags: entertainment newsgurmeet choudharyGurmeet Choudhary News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

navri mile hitlerla serial off air
Entertainment

झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका वर्षभरानंतर बंद होणार, कलाकार भावुक, म्हणाले, “इथली माणसं…”

मे 15, 2025 | 5:16 pm
kalki koechlin water birth
Entertainment

कल्की कोचलिनने पाण्यात मुलाला दिला जन्म, चुडैल म्हणून लोकांनी हिणवलं अन्…; ‘वॉटर बर्थ’ नक्की काय?

मे 15, 2025 | 3:43 pm
Tinnu Anand On Trolling
Entertainment

रस्त्यावरच्या कुत्र्यांना हॉकी स्टिकने मारण्याच्या विधानावरुन टिनू आनंद यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, “कुत्र्यांनी माझ्यावर हल्ला केला तर…”

मे 15, 2025 | 3:33 pm
Garbage Collector Passed 10th Exam
Women

पतीपासून विभक्त, लेकाचा एकटीने सांभाळ अन् …; पुण्यातील कचरा वेचणारी ‘ती’ झाली दहावी पास, प्रेरणादायी संघर्ष

मे 15, 2025 | 2:00 pm
Next Post
Taapsee Pannu Angry on paparazi

"माझ्यावर चढू नका", पापाराझींवर भडकली तापसी पन्नू, 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरीही संतापले, म्हणाले, "ही भविष्यात…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.