बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर या दोन बहिणींना आज कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. दोघींनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं असं आपलं एक स्थान निर्माण केलं आहे. करीना व करिश्मा इंडस्ट्रीमधील सर्वात प्रेमळ बहिणींपैकी एक आहेत. दोघींमधील बॉन्ड सर्वांना माहिती आहे. दोघी बहिणी एकमेकींच्या चांगल्या वाईट काळात एकमेकांबरोबरचं असतात. करिश्मा कपूरचं लग्न उद्योजक संजय कपूर याच्याबरोबर झालं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अशातच करिश्माच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Kareena hiding her face in Karisma Marriage)
या व्हायरल करीना आपल्या बहीणीच्या लग्नात तिच्या जवळ बसली असल्याचे पाहायला मिळत आहे आणि यात तिच्या डोक्यावर पदर असल्याचेही पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये करीना तिचा हिरवा साडीचा पदर डोक्यावर नीट सावरताना दिसत आहे. तिचा हा जुना व्हिडीओ पाहून चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. “करीना कपूर ही अक्षरश: यूपीच्या एका सामान्य लग्नातील वधूसारखी दिसते. “करीनाला पाहून हसणारी मीच आहे का?”, “करीनाला बघा, तिचा मूड नेहमी असाच असा असतो”, तर आणखी “करीना ही ती मुलगी आहे जिला अशा लग्नकार्यात डोके झाकण्यासाठी काकी किंवा मावशीकडून फटकारले जाते”. अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये करिश्मा कपूर गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. पांढरी शेरवानी आणि त्याला जुळणारी पगडी घातलेल्या तिच्या शेजारी बसलेल्या तिच्या माजी पती संजयशी ती लाजत काहीतरी बोलताना दिसत आहे. करिश्मा कपूरच्या लग्नात कपूर कुटुंबियांनी सहभाग घेतला होता. करिश्मा, संजय, करीना आणि बबिता रणधीरचे भाऊ ऋषी कपूर आणि राजीव कपूर तसेच त्यांच्या बहिणी रितू नंदा आणि रीमा कपूर होते.
संजय आणि करिश्मा यांच्या घटस्फोटाला अनेक वर्ष झाली आहेत. पण दोघांच्या नात्याच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. घटस्फोटानंतर करिश्मा कपूर हिने दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. तर संजय याने तिसरं लग्न केलं. करिश्मा कपूर ही संजय याची दुसरी पत्नी होती. घटस्फोटानंतर करिश्मा हिने दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आता अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर करिश्मा कायम सक्रिय असते.