शनिवार, मे 17, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : निक्कीनंतर आता अंकिता वालावलकरवरही वर्षा उसगांवकरांचा राग, बडबडतच राहिल्या अन्…; नक्की चुकीचं कोण?

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 9, 2024 | 5:35 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update Varsha Usgaonkar complained about Ankita Valawalkar

Bigg Boss Marathi 5 मध्ये निक्कीनंतर आता अंकिता वालावलकरवरही वर्षा उसगांवकरांचा राग, थेट बिग बॉसकडेच केली तक्रार

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या स्पर्धकांचा खेळ पाहण्यास मजा येत आहे. नुकताच घरातील सदस्यांनी नॉमिनेशन टास्कदरम्यान आवश्यक किराणा सामान विकत घेतले. या टास्कदरम्यान पॅडी, योगिता, सूरज, निखिल, निक्की आणि घन:श्याम हे घरातील सदस्य नॉमिनेट झाले. घरात पहिल्या दिवसापासून घरातील स्पर्धकांमध्ये वादावादी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक स्पर्धक वाद घालत आहेत. निक्की-वर्षा, आर्या-जान्हवी यांची भांडणं आता काही नवीन राहिलेली नाहीत. अशातच कालच्या भागात या नॉमिनेशन टास्कवरुन घरातील सदस्यांमध्ये विचारविनिमय झाला. यावेळी घरात दोन गट पडल्याचे दिसून आले.

घरात अंकिता, धनंजय, निखिल, सूरज, पॅडी, अभिजीत, योगिता व आर्या यांचा एक ग्रुप होता तर तिकडे जान्हवी, अरबाज, घन:श्याम, वैभव, निक्की, इरीना व वर्षाताई यांचा एक ग्रुप पाहायला मिळाला. यावेळी घरातील टास्कवरुन वर्षा उसगांवकरांनी ‘बिग बॉस’कडे अंकिता वालावलकरबद्दल गॉसिप केल्याचे पाहायला मिळाले. घरी कुणी नसताना वर्षा घरातील एका कॅमेऱ्याजवळ आल्या आणि त्यांनी ‘बिग बॉस’कडे अंकिताबद्दल तक्रार केली.  

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : आधी कुशीत जाऊन रडला आता डीपीशीच भांडणं करतोय छोटा पुढारी, दोघांमध्ये जुंपली अन्…; नक्की काय घडलं?

यावेळी वर्षा यांनी कॅमेऱ्यासमोर असं म्हटलं की, “कॅप्टनच्या बाथरूममध्ये निक्की गेली तेव्हा अंकिता तिला बोलली की तुमच्या त्या रोमॅंटिक कपल बोलली. तरी बरं अंकिता तिला तरी बोलली म्हणून नशीब. नाही तर तिथेही तिच्याच बाजूने बोलली असती तर मला वाईट वाटलं असतं. मी काहीही बोलले तर त्याच्याकडे लक्ष दे, मी पारदर्शक भिंत असल्यासारखी माझ्याकडे का बघत असते? आणि मी संचालकाच्या टास्कदरम्यानही तिला विचारलं. कारण मला टास्क खूप उशिराने कळतात”.

आणखी वाचा – Video : करिश्मा कपूरच्या लग्नात करीना कपूरने पदराने लपवलेलं तोंड, करवली म्हणून मिरवतानाचा ‘तो’ जुना व्हिडीओ समोर

‘बिग बॉस’चा शो सुरु होऊन आता १२ दिवस पूर्ण झाले असून हळहळू घरातील सदस्यांची एकमेकांबरोबर खटके उडत आहेत. त्यामुळे या घरात कुणाचा निभाव लागणार? कॉन कुणावर किती भारी पडणार हे लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या कालच्या भागात टीव्ही चॅनलवर घरातील सदस्य धमाकेदार परफॉर्मन्स सादर करताना दिसले. घन:श्याम हे सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसले. त्यामुळे कालचा भाग खूपच रंजक झाला             

Tags: ankita walawalkarbigg boss marathi 5Konkan Hearted Girlvarsha usgaonkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Dhadakebaj Movie Shooting Story

'बंदुकीची गोळी हातातच फुटली अन्…", लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवावर बेतला असता 'धडाकेबाज' मधील 'तो' सीन

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.