सध्या छोट्या पडद्यावर नवनव्या मालिका या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकतीच सुबोध भावे, शिवानी सुर्वे या कलाकारांच्या नव्या मालिकांची चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. या नव्या मराठी मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला येत असतानाच आता या मालिकेत नव्या मालिकेची एक एंट्री झालेली पाहायला मिळत आहे. ही मालिका ‘स्टार प्लस’ या हिंदी वाहिनीवर आली असून या मालिकेत मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आलेला पाहायला मिळत आहे. एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याची या मालिकेत वर्णी लागली असल्याची खास पोस्ट शेअर केली आहे. (Amol Naik New Serial)
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे ओळख मिळालेल्या एका अभिनेत्याची नव्या हिंदी मालिकेत वर्णी लागली आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेमुळे राणादा व पाठक बाई ही जोडी घराघरांत पोहोचली. या मालिकेत बरकतच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमोल नाईकही चर्चेत आलेला पाहायला मिळाला. अमोल आता या नव्या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सोशल मीडियावरुन अमोलने पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती त्याच्या चाहत्यांसह शेअर केली.
‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘माटी से बंधी डोर’ या नव्या मालिकेत अमोल झळकणार आहे. लवकरच ही मालिका सुरु होणार असून नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत अभिनेत्री ऋतुजा बागवे व अभिनेता अंकित गुप्ता प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. तर अमोलही वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
‘माटी से बंधी डोर’ मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करत अमोलने लिहिलं आहे की, “श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ‘स्टार प्लस’वरील नवीन सुरु होत असलेल्या ‘माटी से बंधी डोर’ या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत तुम्हा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुमची साथ, प्रेम, आशीर्वाद माझ्या व माझ्या टीमबरोबर कायम असतात. तसेच राहू दे…गणपती बाप्पा मोरया…श्री स्वामी समर्थ”. अमोलच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.