शुक्रवार, सप्टेंबर 11, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?”, वयावरुन ट्रोल करणाऱ्यांवर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, “बोलण्यात ताकद…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 9, 2024 | 11:42 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Narkar Answers To Trollers

"तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?", वयावरुन ट्रोल करणाऱ्यांवर ऐश्वर्या नारकर भडकल्या, म्हणाल्या, "बोलण्यात ताकद…"

सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीच नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर. ऐश्वर्या नारकर यांनी आजवर त्यांच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंग रील शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. बरेचदा त्या त्यांचे पती अविनाश नारकर यांच्यासह डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. या वयात दोघांची एनर्जी तरुणाईला लाजवेल अशी आहे. या डान्स व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांना ट्रोलही केलं आहे. मात्र या ट्रोलिंगला न जुमानता त्या नेहमीच ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर देत असतात. (Aishwarya Narkar Answers To Trollers)

ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळत आहे. या मालिकेच्या सेटवरील धमाल, मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ त्या नेहमीच शेअर करत असतात. मालिकेतील कलाकारांबरोबर त्या नेहमीच हटके आणि ट्रेंडिंग रील व्हिडीओ बनवत असतात. अशातच ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक रील शेअर केलं आहे. या रीलवर त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. या ट्रोलिंगला ऐश्वर्या यांनी उत्तरही दिलेलं पाहायला मिळतं.

आणखी वाचा – सुबोध भावेनंतर शिवानी सुर्वेच्याही नव्या मालिकेची घोषणा, अभिनेत्रीच्या नव्या लूकची चर्चा, प्रोमो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Ekta Dangar (@ektadangar)

ऐश्वर्या नारकर यांनी तितीक्षा तावडे, अमृता रावराणे, एकता या कलाकारांसह एक फनी रील व्हिडीओ शूट केला आहे. सध्या इंटरनेटवर कार्टून स्वरूपात चेटकणीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या डायलॉगवर आता ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे, एकता, अमृताने व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या नारकर व अमृता अभिनय करताना दिसत आहेत, तर एकता व तितीक्षा त्यांच्यासाठी डायलॉग बोलताना दिसत आहेत. अभिनेत्रींचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होताना पहायला मिळत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.

आणखी वाचा – साक्षीच्या हाती लागणार का कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पुरावे?, सायली-अर्जुनच्या नात्यात ठरणार दुराव्याचं कारण अन्…; मालिकेत रंजक वळण

तर काही नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोलदेखील केलं आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “तुमचं वय काय आणि तुम्ही करताय काय?”,या ट्रोलिंगला उत्तर देत ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, “बोलण्यात ताकद वाया घालवू नका मजा करा. आयुष्य एकदाच मिळतं. ते पूर्ण जगा”. ऐश्वर्या यांच्या या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्यांना पाठिंबा दर्शिवला आहे. “मान्य आहे. प्रत्येक क्षण हसत जगा”, “ज्यांनी असले अ‍ॅनिमेटेड व्हिडीओ पाहिले नाहीत त्यांना तुम्ही काय करताय ते समजणार नाही. त्यामुळे तुम्ही दुर्लक्ष करा”, असं म्हणत त्यांना सपोर्ट केला आहे.

Tags: aishwarya narkarAishwarya Narkar Answers To Trollersmarathi actresssatvya mulichi satvi mulagi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
Satvya Mulichi Satavi Mulgi Marathi serial update Netra is praying to deviaai for fight against Virochak

अखेर युद्धाला सुरुवात, विरोचकाविरुद्ध लढण्यासाठी नेत्राचे देवीआईला साकडं, राजाध्यक्ष कुटुंबाच्या मदतीला धावून येईल का त्रिनयना देवी?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.