देशभरात मोठ्या जल्लोशात दिवाळी साजरी केली गेली. आता सगळ्यांनाच तुळशीच्या विवाहाचे वेध लागले आहेत. हिंदु धर्मामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचा दर्जा दिला जातो कार्तिक शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाह सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. दिवाळी झाल्यानंतर देवउठणीच्या दिवशी सर्वत्र तुळशीचा विवाह मोठ्या उत्साहात साजरा करतात. आता तुळशी विवाह नक्की कधी आहे? मुहूर्त याबद्दल आपण जाणून घेऊया. या वर्षी तुळशी विवाह १३ नोव्हेंबर २०२४ रोजी असणार आहे. यावेळी एक दिवस आधिक १२ नोव्हेंबरला देवउठणी एकादशी चातुर्मासाची सांगता आहे. या दिवशी भगवान विष्णुचा तुळशीशी शालिग्राम स्वरूपात लग्न लावले जाते. (tulsi vivah 2024)
या वर्षी तुळशी विवाहाचा मुहूर्त सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी सुरु होणार असून ५ वाजून ५५ मिनिटांनी संपणार आहे. तुळशी विवाह घराच्या अंगणात करावा, यासाठी सूर्यास्तानंतरची वेळ वेळ निवडा. यावेळी तुम्ही काही उपाय केल्यास तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो. त्यामुळे तुळशी विवाहा दरम्यान कोणते उपाय करावेत हे जाणून घेऊया.
यावेळी कुंकू, दागिने, टिकली, बांगड्या, लाल साडी किंवा ओढणी अशा गोष्टी तुळशीला चढवाव्यात. तसेच कच्चे दूध व मिठाईचा नैवेद्य दाखवा. पूजेनंतर सर्व समान एखाद्या गरीब सवाष्ण महिलेला द्या. यामुळे तुमचे भाग्य उजळू शकते तसेच घरात सुख-समृद्धी येते. तसेच यासाठी या दिवशी तुळशीच्या समोर दिवादेखील लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आर्थिक समस्यादेखील दूर होतात.
तसेच तुळशीच्या लग्नादिवशी सर्व विधी पूर्ण करावेत. लक्ष्मी मातेला ओढणी ठेवा आणि त्यानंतर तुळशीच्या मंत्राचा जप करा. यामुळे वैवाहिक सुख-शांती मिळते. तसेच तुळशी विवाहाच्या दिवशी मंगलाष्टका म्हणणे शुभ मानले जाते. यामुळे पती-पत्नीच्या नात्यात खूप गोडवा येतो. त्याचप्रमाणे अजून काही समस्या द्यायच्या असतील तर तुळशी विवाहाच्या दिवशी पिवळ्या रंगाचा धागा घ्या आणि त्याला १०८ वेळा गाठ मारा आणि तो तुळशीच्या रोपट्यावर बांधा. त्यानंतर विधीवत पूजा करा. त्यामुळे सगळ्या अडचणी दूर होतील.